पैसे नसल्यामुळे पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन तो 10 कि.मी. चालत गेला - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पैसे नसल्यामुळे पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन तो 10 कि.मी. चालत गेला

Share This
ओडिशा / भुवनेश्‍वर 25 Aug 2016 - आर्थिक विकासाच्या गप्पा किती पोकळ आहेत, विकासाची गंगा नेमकी कोणासाठी, या प्रश्‍नांचे भीषण वास्तव ओडिशामधील घटनेने समोर आले आहे. टीबीच्या आजारामुळे पत्नीचा मृत्यू झाला, मात्र जवळ पैसे नसल्यामुळे रुग्णालयाने अ‍ॅम्ब्युलन्स दिली नाही. अखेर त्या गरीब आदिवासी पतीने पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेतला आणि 10 कि.मी. चालत गेला. यावेळी त्याच्याबरोबर 12 वर्षांची मुलगीसुद्धा चालत होती. मन सुन्न करणारी ही घटना ओडिशामधील आहे. दरम्यान ही घटना मीडियामध्ये आल्यानंतर ओडिशा सरकारने या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले. 



42 वर्षांच्या दाना माझीचे हे वृत्त प्रसिद्ध झाले आणि सरकारी यंत्रणांच्या अनास्थेमुळे देशभर संताप व्यक्त झाला. दाना माझी यांची पत्नी अमंग ही क्षयरोगाने आजारी होती. भवानीनगरातील सरकारी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असताना बुधवारी मृत्यू झाला. भवानीनगरापासून माझीचे गाव ६० कि.मी.वर आहे. कालाहांडी जिल्ह्यातील मेलघर गावात त्यांचे घर आहे. मृत पत्नीचे शव घरी नेण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्स द्यावी अशी विनंती माझीने केली पण सरकारी रुग्णालयाच्या प्रशासनाने यावर त्यांना नकार दिला. माझी विनवण्या करीत हातापाया पडला पण प्रशासनाला पाझर फुटला नाही. अखेर माझीने पत्नीचा मृतदेह चादरीत गुंडाळला आणि खांद्यावर टाकून निघाला. त्याच्याबरोबर चालत होती 12 वर्षांची मुलगी. रडून रडून दोघांच्या डोळ्यांतील अश्रू आटले होते. 10 ते 12 कि.मी. गेल्यानंतर रस्त्यावरील तरुणांना हे दृश्य दिसले. तरुणांच्या मनाला पाझर फुटला. तरुणांनी तातडीने जिल्हा प्रशासनाला जागे केले आणि माझीच्या गावापर्यंत अ‍ॅम्ब्युलन्सची व्यवस्था केली. 

दरम्यान हि मन सुन्न करणारी ही घटना मीडियामध्ये आल्यानंतर कालाहांडीचे जिल्हाधिकारी ब्रुंद्धा डी यांनी तातडीने अजब खुलासा केला. माझीनेच अ‍ॅम्ब्युलन्सची वाट पाहिली नाही असा दावा केला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages