गुजरातमध्ये उसळलेल्या जातीय दंगलींना पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार - हार्दिक पटेल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

गुजरातमध्ये उसळलेल्या जातीय दंगलींना पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार - हार्दिक पटेल

Share This
अहमदाबाद 25 Aug 2016 – गुजरातमध्ये 2002 सालात उसळलेल्या जातीय दंगलींना पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार होते. त्या दंगलीत वापर करून घेतलेले पटेल समाजातील शंभरावर तरुण आजन्म कारावास भोगत आहेत, असा थेट आरोप पटेलांच्या आरक्षण आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी केला आहे.


हार्दिक पटेल यांनी पंतप्रधान मोदी यांना या मुद्द्यावर एक पत्र पाठवले आहे. दंगलीच्या प्रकरणात आजन्म कारावास झालेल्या पटेल समाजातील तरुणांची यादीही या पत्रासोबत जोडली आहे. गुजरातमधील २००२ च्या दंगलींचा फायदा उठवत मोदी आधी मुख्यमंत्री झाले. नंतर देशाचे पंतप्रधानही झाले. पण त्या दंगलीत वापर करून घेण्यात आलेल्या पटेल समाजातील तरुणांना त्यांनी वार्‍यावर सोडले असे हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे. दंगलीच्या प्रकरणात आजन्म कारावासाची शिक्षा झालेल्या त्या तरुणांची शिक्षा माफ करण्यासाठी पंतप्रधान मोदी हे राष्ट्रपतींकडे मागणी करू शकले असते. मोदिंना देशात आणि जागतिक व्यासपीठावर आपण ‘सेक्युलर’ असल्याचे बिंबवायचे असल्याने त्यांनी असे केले नाही असे हार्दिक पटेल यांनी मोदींना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages