दहीहंडी उत्सवामध्ये 18 वर्षांखालील मुलांच्या सहभागास बंदी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दहीहंडी उत्सवामध्ये 18 वर्षांखालील मुलांच्या सहभागास बंदी

Share This
मुंबई, दि. 24 Aug 2016 : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने दहीहंडी उत्सवामध्ये 18 वर्षाखालील मुलांच्या सहभागास बंदी घालण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.  


दहीहंडीमध्ये सहभाग घेणाऱ्या मुलांच्या वयाबाबत असणाऱ्या शासन परिपत्रकामध्ये १२ वर्षावरून १८ वर्ष असा बदल करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दि. ११ ऑगस्ट २०१४ अन्वये आदेश दिले होते. तसेचसर्वोच्च न्यायालयाच्या एस.पी.एल.क्र. ६३७१/२०१४ या न्यायालयीन प्रकरणामध्ये दि.१७ ऑगस्ट २०१६ रोजीच्या सुनावणी अन्वये उच्च न्यायालयाचे आदेश कायम करण्यात आले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने दहीहंडी उत्सवामध्ये १८ वर्षाखालील मुलांच्या सहभागास बंदी घालण्यात आली  आहे, अशी माहिती महिला व बालविकास  विभागातर्फे  परिपत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा सांकेतांक २०१६०८२४१२५६०२०९३० असा आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages