केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा 1 सप्टेंबरला मुंबईत सत्कार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा 1 सप्टेंबरला मुंबईत सत्कार

Share This
मुंबई दि 26 Aug 2016 - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या राज्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल येत्या गुरुवार दि 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता मुंबईत षण्मुखानंद सभागृह येथे रिपब्लिकन पक्षातर्फे सत्कार आयोजित करण्यात आला असल्याची माहिती रिपाइंचे मुंबई प्रदेश अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी दिली.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर केंद्रिय मंत्रिमंडळात त्यांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पक्षाचे कोणतेही नेतृत्व स्थान मिळवू शकले नाही. केंद्रिय मंत्रीमंडळात स्थान मिळविणारे रामदास आठवले हे रिपाइंचे एकमेव नेतृत्व ठरले आहे. रिपाइंला मिळालेल्या या ऐतिहासिक यशाबद्दल देशभर आनंद उत्सव आंबेडकरी जनतेने साजरा केला असून येत्या गुरुवार दि 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षातर्फे नवनिर्वाचित केंद्रीय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांचा सत्कार मुंबईत सायन येथील षण्मुखानंद सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे.

नामदार रामदास आठवले यांच्या सत्कार सोहळ्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिक्षण मंत्री विनोद तावडे, स्वाभिमान शेतकरी संघटनेचे प्रमुख खासदार राजू शेट्टी, शिवसंग्राम चे प्रमुख आमदार विनायक मेटे, स्थानिक खासदार राहुल शेवाळे आदी मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. यावेळी महायुतीचे राज्य सरकारमधील नवनियुक्त मंत्री महादेव जानकर आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचाही भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे. अशी माहिती रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी दिली. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages