मुंबई / प्रतिनिधी 26 Aug 2016 -
मुंबई महानगरपालिकेच्या शाळांत सूर्यनमस्कार आणि योगासने सक्तीची करण्याबाबत ठरावाला सभागृहात मंजूरी मिळाली असली तरी याला विरोध होत आहे. त्यातच पालिका शिक्षणाधिकाऱ्याने आयुक्तांना अंधारात ठेवत तसे परिपत्रक एक महीना आधीच (२६ जुलै २०१६) काढले असल्याने त्या अधिकाऱ्याला निलंबित करावे अशी मागणी समाजवादी पक्षाद्वारे पालिका आयुक्तांकडे करण्यात आली. तसेच या विरोधात कोर्टात जाण्याचा इशारा समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी दिला आहे.
दरम्यान सूर्यनमस्कार सक्तीचे केल्यावर समाजवादी पक्षाने कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. तशी नोटिसही पालिका आयुक्तांना देण्यात आली आहे. शुक्रवारी आझाद मैदानात समाजवादी पक्षाने सूर्यनमस्कार सक्ती विरोधात निदर्शने केली. यावेळी आमदार अबू आझमी, गटनेते रईस शेख, नगरसेवक अशरफ आझमी व इतर नगरसेवक उपस्थित होते. निदर्शना दरम्यान शिष्टमंडलाने पालिका आयुक्तांची भेट घेतली असता सभागृहात मंजूर झालेला ठराव ऐच्छिक करावा व शिक्षण अधिकाऱ्याने सभागृहात ठराव मंजूर झाला नसताना एक महीने आधीच 26 जुलैलाच सूर्यनमस्कार सक्तीबाबत परिपत्रक काढले आहे. असे परिपत्रक काढ़ने धार्मिक भावनाना ठेच पोहचवणारे असल्याने परिपत्रक काढणाऱ्या शिक्षणाधिकारी महेश पालकर याना निलंबित करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. सूर्यनमस्काराची सक्ती केल्यास सोमवार पासून सहयांची मोहिम व कोर्टात जाण्याचा इशारा रईस शेख यांनी दिला आहे.

पालिका शाळांत सूर्यनमस्काराची सक्ती
मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात शालांमधे सूर्यनमस्कार करण्याच्या ठरावाला आवाजी मताने शिवसेना भाजपाने मंजूरी दिली आहे. यावेळी झालेल्या चर्चेवेळी महापालिका शाळांमध्ये मुस्लिम आणि मागासवर्गीय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिकत असल्याने सूर्यनमस्कार आणि योगासने सक्तीची करण्याच्या भाजपच्या या छुप्या अजेंड्याला काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, समाजवादी पक्षाने तीव्र विरोध केला. सूर्यनमस्कार हे हिंदू धर्माशी निगडित असून इतर धर्मीय विद्यार्थ्यांवर सक्ती कशासाठी, असा सवाल करण्यात येत आहे. ही ठरावाची सूचना हा राज्यघटनेने दिलेल्या स्वातंत्र्यावरील घाला आहे. त्यामुळे "सूर्यनमस्कार‘ ऐच्छिक करावा अशी मागणीही केली जात आहे. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राचे भगवीकरण करण्याचा भाजपचा छुपा अजेंडा आहे, ज्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होऊ शकत असल्याने सूर्यनमस्कार व योग सक्तीचे करू नए अशी मागणी करण्यात आली होती. सभागृहात या विषयावर चर्चा सुरु असताना बघ्याची भूमिका घेणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेने अखेर भाजपाने आणलेल्या प्रस्तावाला साथ देत आवाजी मतदानाने पालिका सभागृहाची मंजुरी मिळवून दिली होती.

No comments:
Post a Comment