29 ऑगस्टच्या बंदमध्ये संघर्ष समिती सहभागी होणार नाही - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 August 2016

29 ऑगस्टच्या बंदमध्ये संघर्ष समिती सहभागी होणार नाही

मुंबई - ओला-उबरच्या विरोधात जय भगवान महासंघाने 29 ऑगस्टला बंद पुकारला आहे. या बंदमध्ये टॅक्‍सी-रिक्षाचालक-मालक संयुक्त संघर्ष समिती सहभागी होणार नाही. बाहेरून आलेले मुंबईकरांना वेठीस धरत असल्याने राज्य सरकारला विचार करण्यासाठी आणखी वेळ देऊ. गणेशोत्सवानंतर आंदोलनाचा निर्णय घेऊ,‘ असे समितीने शुक्रवारी (ता. 26) पत्रकार परिषदेत जाहीर केले.
जय भगवान महासंघ, स्वाभिमान संघटनेने रिक्षा-टॅक्‍सी बंदचा इशारा दिला आहे. हा एकतर्फी बंद असल्याचा दावा आठ-नऊ संघटनांना एकत्र करून स्थापन झालेल्या टॅक्‍सी-रिक्षाचालक-मालक संयुक्त संघर्ष समितीने केला आहे. "या बंदमध्ये आम्ही सहभागी होणार नाही. सरकारबरोबर कोणतीही चर्चा झालेली नसताना कधीही बंदची भूमिका घेणाऱ्या संघटनांचा आम्ही निषेध करतो. त्या दिवशी रिक्षा-टॅक्‍सी रस्त्यावर धावतील. मुंबई टॅक्‍सीमेन्स युनियन्स न्यायालयात लढा देत असल्याने ते आमच्याबरोबर नाहीत,‘ असे समितीच्या वतीने नीलेश चव्हाण सांगत होते. या समितीमध्ये संग्राम टॅक्‍सी व रिक्षा युनियन, मुंबई टॅक्‍सीचालक-मालक सेना, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना व इतर संघटनांचा समावेश आहे; मात्र मोठ्या संघटना या समितीपासून चार-हात दूर असल्याने या बहिष्काराचा फारसा परिणाम बंदवर होणार नाही.

ओला-उबरच्या स्पर्धेला टॅक्‍सी-रिक्षाचालक घाबरत नाही. स्टॅण्ड सोडून चालक ग्राहकाच्या घरापर्यंत जायला तयार आहेत. मानसिकता बदलण्याची तयारी चालकांनी केली आहे. त्याकरिता राज्य सरकारने पुढाकार घेऊन ऍप तयार करावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बैठकीसाठी वेळ नाही. हा प्रश्‍न लवकर मार्गी लागावा. गणेशोत्सवानंतर संघर्ष समिती आंदोलन करण्याचा निर्णय घेईल, असे समितीचे सदस्य ऍड. उदय आंबोणकर यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS