पालिका शाळेतील विद्यार्थ्यांबरोबरच नगरसेवकांनाही योग आणि सूर्यनमस्कार सक्तीचा करा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिका शाळेतील विद्यार्थ्यांबरोबरच नगरसेवकांनाही योग आणि सूर्यनमस्कार सक्तीचा करा

Share This
मुंबई - योग आणि सूर्यनमस्कार यावर मुंबईत राजकीय हट्टयोग सुरू आहे. त्यात आता मनसेनेही उडी घेतली आहे. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांबरोबरच नगरसेवकांनाही योग आणि सूर्यनमस्कार सक्तीचा करा, अशी ठरावाची सूचना मनसेने मांडली आहे. एवढेच नव्हे, तर आठवड्यातून पाच दिवस योग वर्गात गैरहजर राहणाऱ्या नगरसेवकाला अपात्रच करा, अशी मागणीही या ठरावाच्या सूचनेत केली आहे. ही ठरावाची सूचना पुढील महिन्यात महासभेत चर्चेसाठी येण्याची शक्‍यता आहे.
महापालिका शाळांमध्ये योग आणि सूर्यनमस्कार सक्तीचे करण्याचा ठराव महासभेत भाजप आणि शिवसेनेने एकत्र येऊन बहुमताने मंजूर करून घेतला. त्याला समाजवादी पक्षाने विरोध केला आहे. पालिका शाळांमध्ये योग आणि सूर्यनमस्कार सक्तीचे होणार असेल, तर नगरसेवकांनाही ही सक्ती केली जावी. प्रभागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांबरोबर जाऊन आठवड्यातील पाच दिवस योग न करणाऱ्यांना नगरसेवकांना अपात्र ठरवावे, अशी मागणी या ठरावाच्या सूचनेत केली आहे. मनसेचे पालिकेतील गटनेते संदीप देशपांडे यांनी ही ठरावाची सूचना मांडली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages