तीन वर्षांच्या कालावधीत मुंबईत 3640 आत्महत्येच्या घटना - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

तीन वर्षांच्या कालावधीत मुंबईत 3640 आत्महत्येच्या घटना

Share This
मुंबई : 
2013 ते 2015 या तीन वर्षांच्या कालावधीत मुंबईत 3640 आत्महत्येच्या घटना घडल्या. त्यामध्ये 2304 (63.2 टक्के) पुरुषांचा समावेश असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आत्महत्या करण्याच्या प्रकाराचा विचार करता 70.7 टक्के जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यापाठोपाठ स्वतःला जाळून घेणे, विषप्राशन करणे व उंचावरून उडी मारून आत्महत्या करणे ही कारणेही महत्त्वाची ठरली. तीन वर्षांच्या काळात 273 महिलांनी स्वतःला जाळून घेतले. तर, पुरुषांमध्ये याच कारणाने 170 जणांनी जीव गमावला. 
माहिती अधिकारात मुंबई पोलिसांकडून पुरवलेल्या माहितीमध्ये अनेक धक्कादायक बाबींचा समावेश असून एकूण आत्महत्यांमध्ये घरगुती कारणावरून 41 टक्के आत्महत्या झाल्या आहेत. तर, 21 टक्के आत्महत्या या आजारपणाच्या कारणाने घडल्या आहेत. त्यामध्ये दीर्घ आजारपण, मानसिक आजारपण (वेड लागणे), कर्करोग, अर्धांगवायू, एडससारखे दुर्धर आजार होणे ही कारणे महत्त्वाची ठरली आहेत. तर, परीक्षेत नापास होण्याच्या भीतीतून 70 मुली व 68 मुलांनी आत्महत्या केल्या. हे सर्वजण 25 वर्षांखालील होते. पुरुषांच्या आत्महत्येमध्ये बेरोजगारी व व्यसनाधिनता ही कारण प्रमुख ठरली असून त्यामुळे अनुक्रमे 226 व 142 आत्महत्या घडल्या आहेत. महिलांमध्ये मात्र लग्नासंबंधीत कारणाने 134 जणींनी आत्महत्या केली. तर, प्रेम प्रकरणातून 54 महिलांनी मृत्यूला कवटाळले. प्रेम प्रकरणामधून आत्महत्या करणारांमध्ये टीव्हीस्टार प्रत्युषा बॅनर्जी, चित्रपट अभिनेत्री जीया खान, मॉडेल विवेक बाबाजी यासारख्या सेलिब्रिटीही होत्या. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages