मुंबई / प्रतिनिधी दि 30 ऑगस्ट 2016
यंदाच्या 12 वीच्या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्याची संख्या अधिक असल्याने 13 वीच्या महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेत जागा अपुऱ्या पडत आहेत त्यामुळे अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत महाविद्यालय प्रवेश प्रक्रियेत 5 टक्के जागा वाढविल्यास प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्याचा प्रश्न सुटू शकतो त्यामुळे या जागा वाढवाव्यात अन्यथा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रिपाइंच्या रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे यांनी दिला आहे. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंच्या निवासस्थानी घुसून तीव्र निषेध आंदोलन करण्याचा इशारा चंद्रशेखर कांबळे यांनी दिला आहे.
गतवर्षी 12 वीचा निकाल अधिक लागल्यानंतर 13 वी प्रवेशाच्या 20 टक्के जागा वाढविण्यात आल्या होत्या. या वर्षी मात्र 12 वी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्याची संख्या अधिक असून सुद्धा केवळ 15 टक्के जागा वाढविण्यात आल्या आहेत, त्या अपुऱ्या असून आणखी 5 टकके जागा वाढविल्या पाहिजेत अशी मागणी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेने केली आहे. अशी मागणी त्वरित मान्य न झाल्यास रिपाइंच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विद्यार्थी नेते चंद्रशेखर कांबळे यांनी दिला आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरुंच्या कालीना येथील निवासस्थानी रिपाइंतर्फे तीव्र निषेध आंदोलन छेडण्याचा निर्वाणीचा इशारा रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेने दिला आहे.

No comments:
Post a Comment