लोकायुक्तांनी राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्या विरोधात चौकशी निश्चित केली - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 August 2016

लोकायुक्तांनी राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्या विरोधात चौकशी निश्चित केली

मुंबई / प्रतिनिधी - लोकायुक्तांनी आज मंगळवार दि.३० ऑगस्ट, २०१६ रोजी राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्या आमदार निधीतून आरे वसाहतीच्या जमिनीवर बांधण्यात आलेल्या व्यायामशाळेच्या अनधिकृत बांधकामाविरोधात चौकशीचे आदेश जारी केलेले आहेत, असे मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले.
राज्यमंत्री वायकर यांनी राज्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून आजतागायत उपरोक्त व्यायामशाळेचे बांधकाम अनधिकृत असल्याचे माहीत असूनही ते निष्कासित करण्यात ते अयशस्वी ठरलेत का? याविषयी सखोल चौकशी करण्यात येईल, असे माननीय लोकायुक्तांनी आदेशित केले आहे, अशी माहिती निरुपम यांनी दिली.

आरे वसाहतीच्या जमिनीवर राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी अनधिकृतपणे उभारलेल्या अत्याधुनिक व्यायामशाळेच्या विरोधात संजय निरुपम यांनी दि. २७ जून, २०१६ रोजी लोकायुक्त यांच्या समक्ष दाखल करण्यात आलेल्या तक्रारीची आज तिसरी सुनावणी होती.

लोकायुक्तानी सखोल चौकशी सुरु करण्याचे आदेश देऊन पुढील सुनावणी दिनांक २६, २७ व २८ सप्टेंबर असे सलग तीन दिवस ठेवली आहे, अशी माहिती मुंबई काँग्रेस अक्त यांनी दिली. निरुपम यांच्यासोबत त्यांचे वकील प्रद्युम्न वाघमारे, सरचिटणीस भूषण पाटील, सचिव राजू पवार आणि फिरोज शहा उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad