राज ठाकरे यांनी जाती अंतासाठी प्रयत्न करावेत - सचिन खरात - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राज ठाकरे यांनी जाती अंतासाठी प्रयत्न करावेत - सचिन खरात

Share This
मुंबई, दि.30 Aug 2016 - अ‍ॅट्रोसिटी कायदा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाती अंतासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने (खरात) केले आहे. ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत रिपाइंचे अध्यक्ष सचिन खरात यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

मीडियापुरते मर्यादित असलेले राज ठाकरे संपलेला जनाधार मिळवण्यासाठी अशी वक्तव्ये करत आहेत. आधी आरक्षणाला आणि आत्ता अ‍ॅट्रॉसिटी कायद्याला विरोध करण्यापेक्षा राज यांनी जाती अंतासाठी काम करण्याचा सल्ला खरात यांनी दिला आहे. जातच नष्ट झाली, तर अ‍ॅट्रॉसिटी आणि आरक्षण आपोआपच नष्ट होईल, असेही खरात यांनी सांगितले. दलितांना न्याय मिळवून देण्याऐवजी ठाकरे यांनी सवर्णांच्या मतांसाठी बेताल वक्तव्ये करणे थांबवावे, अन्यथा रिपाइं मनसे स्टाईलनेच मनसेला धडा शिकवेल, असा इशारा खरात यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages