शरद पवारांनी चूक सुधारल्याबद्दल आंबेडकरांनी केले अभिनंदन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

शरद पवारांनी चूक सुधारल्याबद्दल आंबेडकरांनी केले अभिनंदन

Share This
मुंबई / प्रतिनिधी - अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याबाबतच्या भूमिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बदल केल्याबाबत भारिप बहुजन महासंघाचे नेते व माजी खासदार अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी पवार यांचे अभिनंदन केले आहे. आंबेडकराईटस् यांच्या तीव्र प्रतीक्रियांमुळे पवार यांना युटर्न घ्यावा लागला, असा दावाही आंबेडकर यांनी केला आहे.
पवार यांनी अ‍ॅट्रॉसीटीत (अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा) बदल करण्याचे विधान मुद्दाम केले होते. वैफल्यग्रस्त मराठा समाजाला चुचकारण्याचा पवार यांचा त्यामागे प्रयत्न होता. पण, त्यांच्या विधानांवर आंबेडकरवाद्यांकडून तीव्र प्रतिक्रिया आल्याने पवार यांना त्यांची गंभीर चूक कळून आली. त्यांनी युटर्न घेतल्यामुळे किमान पवार यांचे पुरोगामीत्व तरी शाबूत राहिले, असे टीपण्णी आंबेडकर यांनी केली.  

सध्या मराठा समाज मोठ्या वैफल्यातून जातो आहे. राज्यात मराठा संघटनांचे लाखालाखात मोर्चे निघत आहेत. मराठा संघटना विधानसभेच्या निवडणुका लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचा पाया उध्वस्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. म्हणुनच पवार यांनी पक्षापासून दूर जाणाऱ्या मराठा समाजाला चुचकारण्यासाठी अ‍ॅट्रॉसीटीबाबत विधान केले होते, असे स्पष्ट करत राष्ट्रवादी पक्षाचे राजकारण संपल्यात जमा असल्याचा दावाही आंबेडकर यांनी केला.

औरंगाबादमध्ये शुक्रवारी पवार यांनी अ‍ॅट्रासीटी कायद्याचा गैरवापर होत असल्याने त्यात दुरुस्तीची वाच्यता केली होती. त्या विधानाबाबत आज पवार यांनी अचानक युटर्न घेतला.. हा कायदा संसदेने केलेला आहे, राज्य त्यात दुरुस्ती करु शकणार नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले. त्यानंतर अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन पवार यांनी भूिमका बदलल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

बंदला महाराष्ट्र लोकशाही डावी आघाडीचा पाठिंबाकामगार कायद्यातल्या बदलांबाबत २ सप्टेंबर रोजी देशातील विविध कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी औद्योगिक बंदला महाराष्ट्र लोकशाही डावी आघाडीचा संपूर्ण पाठिंबा असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. तसेच केंद्रातले मोदी यांचे वैदीक सरकार आपल्याच हिंदु कामगारांना असंघटीत क्षेत्रात फेकत असल्याचा आरोप त्यांनी केला. 

"लँड टू दलित" हा संघर्षाचा यापुढे केंद्रबिंदू 
गुजरातमधील उना आंदोलनातून प्रत्येक दलित कुटुंबास पाच एकर जमीन देण्याची मागणी पुढे आली आहे. भविष्यात दलितांची ही मागणी उग्र रुप धारण करेल."लँड टू दलित" हा संघर्षाचा यापुढे केंद्रबिंदू राहील, असे आंबेडकर यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages