मुंबई - मुकेश धावडे
समाजसुधारक आणि शिक्षणतज्ज्ञ एम यांनी वृक्षारोपणाला प्रोत्साहन देऊन एक चांगले पर्यावरण तयार व्हावे यासाठी मायट्री नावाच्या प्रकल्पाची सुरुवात केली असून या प्रकल्पात प्रत्येकाने आपला मित्र किंवा नातेवाईकांच्या नावाने एक रोपटे लावून त्याची निगा राखणे अपेक्षित आहे. तसेच निसर्गासोबत गुण्यागोविंदाने राहण्याचा संदेश देण्याबरोबरच, या प्रकल्पाचा आंतरिक उद्देश निस्वार्थीपणा वाढीस लावण्याचा आहे. त्यामुळे एम यांनी त्यांच्या अनुयायांसह माहिमच्या महाराष्ट्र निसर्ग उद्यानात शनिवार (ता. 27) ऑगस्ट 2016 रोजी 120 झाडे लावून त्यांची निगा राखण्याची प्रतिज्ञा केली. या आगळ्यावेगळ्या प्रकल्पाला मेधा मांजरेकर, सुप्रिया पिळगावकर, यासारख्या सेलिब्रेटींनी हजेरी लावली. तर माहिमच्या उदयानानंतर हा उपक्रम गोरेगावच्या व्हिसलिंग वूड्स येथे आणखी झाडांचे रोपण करुन पुढे नेण्यात आला.
प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी एम म्हणाले की, “समाजसुधारणेत प्रत्येकाने सहभाग घेण्यास प्रोत्साहन देण्यासाठी मायट्री सारखा प्रकल्प महत्त्वपूर्ण आहे, एक रोप लावून त्याच्या वाढीची काळजी घेण्यामागे निसर्गासोबत व्यक्तीची नाळ जोडली जाते. या बंधामुळेच आपला विकासही होतो.” मायट्री हे मानव एकता मिशनचा उपक्रम असून सत्संग फाऊंडेशनचा एक भाग आहे. धर्म, वर्ण यातील वेगळेपण भौगोलिक, सांस्कृतिक आणि वैचारिक मतभेद यांच्यापलिकडे जाऊन मानवाला एकत्र आणणे हे मिशनचे उद्दिष्ट आहे. शांतता आणि सहजीवन या पायावर उभ्या असलेले मानव एकदा मिशन प्रत्येक मनुष्यात असलेल्या चांगुलपणाला प्रोत्साहन देण्याच्या तत्त्वावर काम करते.


No comments:
Post a Comment