गोविंदा पथकांवरील सदोष मनुष्‍यवधाचे ३०८ हे गंभीर स्‍वरूपातील कलम मागे घ्यावे - आशिष शेलार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

गोविंदा पथकांवरील सदोष मनुष्‍यवधाचे ३०८ हे गंभीर स्‍वरूपातील कलम मागे घ्यावे - आशिष शेलार

Share This
मुंबई दि. 27 - न्यायालयाचा मान सर्वांनी राखायलाच हवा त्यामुळे न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत भाजपाला कोणतेही भाष्य करायचे नाही. मात्र काही गोविंदा पथकांवर 308 हे सदोष मनुष्यवधाचे कलम लावण्यात आले आहे. याचा विपरित परिणाम भविष्यात तरूण गोविंदाच्‍या आयुष्यावर होईल म्हणून हे कलम मागे घेण्यात यावे. आवश्यकता भासल्यास अॅडव्‍होकेट जनरल यांचे मत जाणून घ्यावे, अशी मागणी मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली.
दहिहंडीचा उत्सव नुकताच पार पडला. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे या उत्सवाला यावर्षी मर्यादेची चौकट आली. या कायद्याच्या चौकटीत राहूनच उत्सव साजरा करा असे आवाहन भाजपाने उत्सव मंडळांना केले होते. न्यायालयाने दिलेले निर्देश पाळणे सर्वांना बंधनकारक आहे आणि ते याहीपुढे पाळले गेले पाहिजेत, अशीच भाजपाची भूमिका आहे, त्यामुळे ज्‍या मंडळांनी हे नियम पाळले नाहीत त्‍यांच्‍यावर न्‍यायालयाचा अवमान केल्‍याप्रकरणी जी कारवाई करण्‍यात आली त्‍याबाबत कोणतेही भाष्य करू इच्छित नाही ते उचित ठरणार नाही असे मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात शेलार यांनी नमूद केले आहे.

ज्‍या मंडळांनी न्‍यायालयाचे निर्देश पाळले नाहीत अशांपैकी मुंबईत सुमारे 29 मंडळावर 21गुन्‍हे तर ठाण्‍यात 20 मंडळावर गुन्‍हे दाखल करण्‍यात आल्‍याची माहिती समोर आली आहे. हा उत्‍सव साजरा करताना काही गोविदा जखमी झाले असून मुंबईच्‍या केईएम रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आलेल्‍या चार जखमी गोविंदांची दि. 26 ऑगस्‍ट रोजी मी आणि राज्‍याचे सांस्‍क‍ृतीक मंत्री विनोद तावडे यांनी भेट घेऊन विचारपूसही केली. यामध्‍ये एक 14 वर्षीय अंकुश नांगरे या मुलाचाही समावेश आहे. त्‍याला गंभीर स्‍वरूपाची दुखापत झाली आहे. अजाणतेपणी त्‍याने केलेल्‍या चुकीची त्‍याला कल्‍पनाही नसून या चुकीमुळे भविष्‍यात त्‍याला अडचणी निर्माण होऊ शकातात असे शेलार यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणले आहे.

पो‍लिसांनी भादवीची अन्‍य काही गंभीर स्‍वरूपाची कलमे या गोविंदावर लावली आहेत. काही गोविंदा पथकांवर भारतीय दंडसंहिता कलम 308 हे सदोष मनुष्‍यवधाचे कलम लावण्‍यात आले आहे. यासह336, 188, 34 अशी विविध गंभीर स्‍वरूपाची कलमे लावली आहेत. अशी गंभीर स्‍वरूपाची कलमे ही तरूण वयात दाखल झाल्‍यास या तरूण गोविंदाच्‍या पुढील आयुष्‍यावर विपरित परिणाम होऊन त्‍यांच्‍या एकुण चढण घडणीवर त्‍याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मानवतेच्या दृष्टीने जनभावना लक्षात घेऊन न्‍यायालयाच्‍या अवमानाचे गुन्‍हे वगळता दाखल करण्‍यात आलेली 308 सारखी गंभीर कलमे सरकारने मागे घ्‍यावीत. आवश्‍यकता भासल्‍यास याबाबत अॅडव्‍होकेट जनरल यांचे मत जाणून घ्‍यावे अशीही विनंती शेलार यांनी केली आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages