भारतात अनेक जाती धर्माचे लोक राहतात. भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला भारतीय संविधानाने आपले विचार मांडण्याचे, आपल्या धर्माप्रमाणे वागण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. भारतीय संविधानाने असे स्वातंत्र्य दिले असले तरी गेल्या दोन वर्षात भाजप सरकारच्या काळात हिंदू धर्मियांची संस्कृती इतर धर्मियायांवर थोपवण्याचा प्रकार सुरु झाले आहेत. भाजपा सरकारच्या काळात लोकांनी काय खावे काय खाऊ नये, कोणी काय करावे, कोणी कसले धंदे करावे हे आता भाजपा आणि त्यांच्या इतर संघटनांकडून ठरवण्यात येऊ लागले आहे.
मुंबईत भाजपाने गुजराती भाषिक लोकांना हाताशी धरत मांसाहार आणि शाकाहारचा वाद निर्माण केला. जैन धर्मियांच्या पर्युषण पर्वात मुंबईमध्ये कोणीही मांसाहार करू नए म्हणून मांसविक्रीवर बंदी आणण्याचा प्रयत्न भाजपाकडून करण्यात आला. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेत तसा प्रस्ताव आणण्यात आला. परंतू या प्रस्तावाला सभागृहात सर्व पक्षांचा आणि सभागृहाबाहेर नागरिकांचा विरोध झाला. मित्र पक्ष शिवसेनेनेही कोणी काय खावे हे भाजपावाले ठरवणार का ? भाजपावाल्यानी लोकांच्या किचनमध्ये घुसू नए अशी टीका करण्यात आली. याच दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने बंदी घालणे योग्य नसल्याचा आदेश दिले.
भाजपाच्या कार्यकाळात गायी बाबत कायदा करण्यात आला. या कायद्याचा सहारा घेत अनेक ठिकाणी तथाकथित गोरक्षकांकडून मुस्लिम आणि मागासवर्गीय समाजातील लोकांना टार्गेट करत मारहाण करण्यात आली. उत्तर प्रदेशातील दादरी गावात एका मुसलमानाने गोमांस खाल्ल्याच्या अफवेवरून अखलाक या मुस्लिमाचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाला. अनेक ठिकाणी गोमांसच्या नावाने मुस्लिम आणि मागासवर्ग समाजातील लोकांना मारहाण केली जात आहे. गुजरात उना मधील मागासवर्गीयांना झालेली मारहाण याचे ताजे उदाहरण आहे. तथाकथित हिंदुत्ववादी गोरक्षकडून मारहाण होत असल्याने भारतात भाजपाच्या विरोधात लाट निर्माण झाली आहे.
भाजपाने बनवलेल्या कायद्याच्या आड असे प्रकार सुरु असल्याने देशाचे सर्वोच्च पदावर असलेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मारहाण करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्याचे सोडून दलितांना मारू नका त्या बदल्यात माझ्यावर गोळ्या झाडा असे वक्तव्य केले आहे. असे वक्तव्य करून देशातील हतबल प्रधानमंत्री अशी ओळख भारतीय नागरिकांत केली आहे. भाजपा आणि त्यांच्या जवळच्या संघटनामुळे प्रधानमंत्र्याला देशाची माफी मागावी लागत आहे. यामधून भाजपाच्या व संघटनांनी काही बोध घ्यायच गरज असताना मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सूर्यनमस्कार घालण्याची सक्ती करणारा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
सूर्यनमस्कार हा एक व्यायाम आहे असे सांगत भाजपच्या नगरसेविका समिती कांबळे यांनी महापालिका सभागृहात प्रस्ताव आणला असला तरी हिंदू धर्मात सूर्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सूर्य हे शैव पंथीय समाजात शंकराचे तर वैष्णव पंथीय समाजात विष्णूचे एक अंग मानले जाते. वेदांमध्ये व पौराणिक ग्रंथांमध्ये सूर्याची उपासना करण्याबद्दल अनेक संदर्भ सापडतात. उगवत्या व मावळत्या सूर्याला दंडवत घालणे हे सूर्यनमस्कारांचे प्रथम उद्दिष्ट आहे. महापालिका शाळांमध्ये बहुसंख्य मागासवर्गीय व मुस्लिम समाजातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अश्या परिस्थितीत एखाद्या धर्मातील सूर्यनमस्कार इतर धर्मिंयावर थोपवले जात असल्याने समाजवादी पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे या पक्षांनी याला कडाडून विरोध केला.
सभागृहात चर्चा सुरु असताना मांसाहार प्रकरणी भाजपाला विरोध करणारी शिवसेना मात्र चुप्प बसून बघ्याची भूमिका घेत होती. मांसाहार प्रकरणी लोकांच्या किचनमध्ये घुसणाऱ्या भाजपावर तोंडसुख घेणाऱ्या शिवसेनेला इतर धर्मियांवर सूर्यनमस्कार थोपवले जात आहेत. हे इतरांच्या धर्मातही घुसण्यासारखे प्रकार आहेत याचा विसर पडला होता. सभागृहात भारतीय संविधानाने दिलेले धार्मिक स्वातंत्र, जागतिक पातळीवर लहान मुलांसाठी कार्यरत असलेल्या युनिसेफ या संघटनेने बनवलेले कायदे याची आठवण करून देण्यात आली. इतकेच नव्हे तर महानगरपालिकेच्या कायद्यात धार्मिक तेढ निर्माण करणारे प्रस्ताव चर्चेला आणू नए असे असताना सूर्यनमस्कार सर्वच धर्मियांना सक्तीचे करण्याचा कायदा करण्यात आला आहे.
महानगरपालिकेच्या सभागृहात सूर्यनमस्कार सक्तीचे न करता ऐच्छिक करण्याची सूचनाही मांडण्यात आली. तत्कालीन शिवसेनेच्या व सध्या काँग्रेसमध्ये असलेल्या नगरसेविका ज्योत्सना दिघे यांनी २००५ साली योग्य सक्तीचा प्रस्तावाला अद्याप राज्य सरकारची मंजुरी मिळाली नसल्याचेही निदर्शनात आणण्यात आले. परंतू या सूचनेकडेही सत्तेची हवा डोक्यात गेलेल्या भाजपा - शिवसेनेने दुर्लक्ष केले आणि बहुमताच्या जोरावर आवाजी मतदानाने प्रस्ताव मंजूर केला आहे. सूर्यनमस्कार सक्तीचे करण्याला समाजवादी पक्षाने जोरदार विरोध केला आहे. त्यासाठी आझाद मैदानात शुक्रवारी (२६ ऑगस्ट) निदर्शने करण्यात आली. पालिका आयुक्तांनाही वकिलामार्फत नोटीस पाठवून सात दिवसात निर्णय न घेतल्यास कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान महानगरपालिकेत सूर्यनमस्कारासारखेच आणखी एक प्रकरण उघडकीस आले आहे. पालिकेने मजूर केलेला योग सक्तीचा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर केला नसताना पालिका शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी महेश पालकर यांनी २६ जुलै २०१६ रोजी सर्व पालिका शाळांमध्ये ईशा फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून योग करावेत अशी सक्ती करणारे परिपत्रक काढले आहे. ज्या प्रस्तावाला राज्य सरकारची मंजुरी मिळाली नाही असे कायदे करायाला पालिका प्रशासनातील अधिकारीही उतावीळ झाल्याचे दिसत आहे. अश्या उतावीळ अधिकाऱ्याला निलंबित करण्याचीही मागणी समाजवादी पक्षाचे गट नेते रईस शेख यांनी केली आहे. पालिका आयुक्त अजोय मेहता हे राज्यातील भाजपा सरकारमधील मुख्यमंत्र्याने पाठवलेले अधिकारी असल्याने ते या बाबत काय निर्णय घेतात याकडे मुंबईकर जनतेचे लक्ष लागले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या मुंबई महानगरपालिकेत एका धर्माचे संस्कार इतर धर्मियांवर लादण्याचे प्रकार होत असताना याची झळ मागासवर्गीय समाजातील अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग यांनाही पोहचणार आहे. यामध्ये अनुसूचित जातीमध्ये व अल्पसंख्यांक म्हणून गणला जाणाऱ्या बौद्ध समाजातील विद्यार्थीही पालिका शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. या बौद्ध धर्मीय विद्यार्थ्यांनाही सूर्यनमस्कार घालण्याची सक्ती होणार आहे. हा प्रस्ताव मंजूर होताना बौद्ध समाजाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या पक्षातील तीन नगरसेवक पालिकेत असताना एकाही नगरसेवकाने यावेळी उपस्थित राहून याचा विरोध केलेला नाही. मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व करणारी समाजवादी पार्टी एकटी लढत आहे इतर अल्पसंख्यांक आणि मागासवर्गीय म्हणवणारे मात्र गप्प बसून तमाशा बघत आहेत हि शोकांतिकाच म्हणावी लागेल.
असो मुंबई महानगरपालिकेत सत्तेची हवा डोक्यात गेलेल्यांनी महानगरपालिकेचे नियम आणि भारतीय संविधानाने दिलेले धार्मिक स्वातंत्र्य पायदळी तुडवले आहेत. याला न्यायालयात आवाहन दिल्यास सूर्यनमस्कारसक्तीचे करण्याचे भाजपाचे मनसुबे उधळले जाणार आहेत.त्यासाठी कोर्टाचा वेळही वाया जाणार आहे. इतकेच नव्हे तर उच्च न्यायालय पालिकेवर ताशेरे ओढू शकते. यामुळे पालिका आयुक्त अजोय मेहता आणि राज्य सरकारने सावध पावित्रा घेत सूर्यनमस्कार किंवा योगची सक्ती न केलेली बरी. अन्यथा येणाऱ्या काळात कोर्टारोबरच मुंबईकर जनताही इतर धर्मियांवर आपले धार्मिक संस्कार थोपवणाऱ्याना धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही याची नोंद घेतलेली बरी.
अजेयकुमार जाधव
मो. ९९६९१९१३६३

No comments:
Post a Comment