डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन प्रवास प्रेरणादायी - वल्सा नायर-सिंह - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन प्रवास प्रेरणादायी - वल्सा नायर-सिंह

Share This
मुंबई, दि.22 Aug 2016 : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन प्रवास प्रेरणादायी आहे. डॉ.आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडित असणाऱ्या दुर्मिळ छायाचित्र व कागदपत्रांचा समावेश असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनदर्शन हे प्रदर्शन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह यांनी आज येथे केले. 


सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पुराभिलेख संचालनालयाच्या वतीने जय हिंद महाविद्यालय येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित प्रदर्शनाचे उद्घाटन करताना  नायर-सिंह बोलत होत्या. यानिमित्त विशेष घडीपुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले. पुराभिलेख संचालनालयाचे संचालक डॉ. दि.प्र.बलसेकर, उपसंचालक सायली पिंपळे, जय हिंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक वाडिया यावेळी उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन प्रवासातील कौटुंबिक घटना, त्यांनी उच्च शिक्षण घेतलेल्या महाविद्यालयाचे छायाचित्र, त्यांचा निवडणूकनामा, मंत्रिपदाची शपथ घेतानाची छायचित्रे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जनता, बहिष्कृत भारत, मूकनायक आणि प्रबुद्ध भारत या वृत्तपत्रातील लेखन, बौद्ध धम्माची दीक्षा, तत्कालीन वृत्तपत्रात त्यांच्याविषयी आलेल्या बातम्यांची कात्रणे, त्यांच्या हस्ताक्षरातील काही निवडक पत्रे, ग्रंथसंपदा, त्यांच्या भावमुद्रा, त्यांच्याविषयी विविध मान्यवरांनी दिलेल्या प्रतिक्रिया आदी बाबींच्या छायाचित्रांचा या प्रदर्शनात समावेश करण्यात आला आहे. हे प्रदर्शन जय हिंद महाविद्यालयात बुधवार दि. 24 ऑगस्टपर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 7 पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages