सुर्यनमस्काराची सक्ती रद्द करा - आयुक्त अजोय मेहता यांना पत्र - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सुर्यनमस्काराची सक्ती रद्द करा - आयुक्त अजोय मेहता यांना पत्र

Share This
मुंबई, दि. 24 Aug 2016 - महापालिका शाळांमध्ये प्रार्थनेवेळी सुर्यनमस्कार सक्तीचा करण्याच्या निर्णयाला समाजवादी पक्षाने आव्हान दिले आहे़. महापालिका कार्यपद्धती विषयक नियमावली नियम १६ अन्वये धार्मिक तेढ निर्माण करणारी अशी ठरावाची सुचना होऊ शकत नाही़.योग आणि सुर्यनमस्कार करणे ही एक धार्मिक क्रिया आहे़ योगासनाचे काही प्रकार मुस्लिम धर्मिय कधी करु शकत नाही़ सुर्यापुढे झुकण्यास सांगणे हे मुस्मिल धर्माच्या विरोधात आहे, असा आक्षेप समाजवादी पक्षाने घेतला आहे़. याविरोधात वेळ पडल्यास न्यायालयीन लढ्याची तयारीही सुरु करण्यात आली आहे़.समाजवादी पक्षाचे नगरसेवक अशरफ आझमी यांनी आयुक्त अजोय मेहता यांना पत्र पाठविले आहे़ यामध्ये पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना योगा करणे वैकल्पिक करण्यात यावे, अशी मगणी केली आहे़. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages