मुंबई, दि. 24 Aug 2016 : मध्य वैतरणा प्रकल्पाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़. १ सप्टेंबर रोजी या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे एका व्यासपीठावर येणार आहेत़.
मध्य वैतरणा धरणाला नाना शंकरशेठ यांचे नाव देण्याची मागणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी काही वर्षांपूर्वी केली होती़ मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या निधानंतर या धरणाला त्यांचे नाव देण्याचे शिवसेनेने ठरविले़ तशी मागणीही गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी केली. १ सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम होणार आहे़ या कार्यक्रमात शिवसेना व भाजपाचे दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर येणार आहेत़ त्यामुळे पालिकेच्या आगामी निवडणुकीत उभय पक्षांची काय भूमिका असेल, याचे संकेत मिळण्याची शक्यता आहे़.
मध्य वैतरणा धरण

मुंबईच्या पाणीपुरवठ्यात ४५५ दशलक्ष लीटरची वाढ करणारे मध्य वैतरणा धरण २०१२ मध्ये पूर्ण झाले़. रोलर कॉम्पेक्टेड काँक्रिट रोलर (आरसीसी) पद्धतीने बांधण्यात आलेले महाराष्ट्रातील हे पहिले धरण आहे़ १९९३ मध्ये मध्य वैतरणा प्रकल्प आखण्यात आला़ त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील मोखाडा येथे हे धरण बांधण्यात येणार होते़ मात्र या प्रकल्पासाठी पावणेदोन लाख वृक्षांची कत्तल करावी लागणार असल्याने पर्यावरण मंत्रालयाने आक्षेप घेतला होता़. अखेर बीड जिल्ह्यात तेवढ्याच वृक्षांचे पुर्नरोपण केल्यानंतर २००७ मध्ये या प्रकल्पाला मंजुरी मिळाली़ चार वर्षांत या धरणाचे बांधकाम पूर्ण झाले आहे़. १९९३ मध्ये चितळे समितीने मध्य वैतरणा धरणाची शिफारस केली़ २००९ मध्ये धरणाचे काम सुरु झाले़. जवहारलाल नेहरु राष्ट्रीय नागरी पुनर्निमाण अभियान अंतर्गत या प्रकल्पाला निम्मा निधी मिळाला़ या प्रकल्पाचा खर्च १२०० कोटी अपेक्षित होता़. मात्र अनेक वर्षांच्या दिरंगाईमुळे हा खर्च दोन हजार कोटींवर पोहोचला़. जलदगतीने पूर्ण होणारे जगातील हे ९ वे आरसीसी धरण आहे़. या धरणाची उंची १०२़४ मीटर एवढी आहे़. भाकरा नंगाल धरणानंतर आरसीसी पद्धतीने बांधण्यात आलेले मध्य वैतरणा हे देशातील दुसरे मोठे धरण आहे़

No comments:
Post a Comment