पालिकेच्या वसाहत विभागातील कर्मचाऱ्याची १३ वर्षात बदली नाही - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 August 2016

पालिकेच्या वसाहत विभागातील कर्मचाऱ्याची १३ वर्षात बदली नाही

एफ दक्षिण वसाहत विभागातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी 
मुंबई / अजेयकुमार जाधव 29 Aug 2016
मुंबई महानगरपालिकेच्या परेल येथील एफ दक्षिण विभागात काम करणाऱ्या भाडे संकलक या पदावरील कर्मचाऱ्यावर पालिका मेहरबान झाली आहे. कदम यांच्या माध्यमातून पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना आर्थिक मलिदा मिळत असल्याने गेल्या १० वर्षात या कर्मचाऱ्याची नियमानुसार बदली करण्यात आलेली नाही. असे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. गेल्या १० वर्षात कदम व इतर अधिकाऱ्यांनी झोपडंपट्टी सुधारणा विभाग / वसाहत विभागात केलेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्याची मागणी मुंबईच्या महापौर, पालिका आयुक्त अजोय मेहता व उपायुक्त आनंद वागराळकर यांच्याकडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे कार्यकर्ते मिलिंद तांबे यांनी केली आहे.


महापालिकेच्या परेल येथील एफ दक्षिण विभागात संजय राजाराम कदम हे भाडे संकलक म्हणून काम करत आहेत. कदम हे गेले १० वर्षे एकाच पदावर कार्यरत असल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे कार्यकर्ते मिलिंद तांबे यांनी माहिती अधिकारातून माहिती मागवली होती. एफ दक्षिण विभागातील आस्थापना विभागाच्या जनमाहिती अधिकारी उज्वला चेतन यांनी दिलेल्या माहिती नुसार कदम हे पालिकेच्या मुद्रणालयात वितरक पदावर कार्यरत होते. मुद्रणालय बंद झाल्याने त्यामधील वितरक पदावरील कर्मचाऱ्यांना उपायुक्त विशेष यांच्या मान्यतेने इतर विभागात वसुली सहाय्यक या पदावर सामावून घेण्यात आले. कदम यांचीही २००३ मध्ये अशीच वसुली सहाय्यक म्हणून नेमणूक करण्यात आली. भाडे संकलक हे पद पालिकेच्या प्रमुख कर्मचारी अधिकारी यांच्याकडून भरण्यात येते. परंतू कदम यांच्यावर मेहरबान असलेल्या तत्कालीन सहाय्यक आयुक्त (वॉर्ड ऑफिसर) वि. ग. बोले यांनी सन २००५ मध्ये त्यांना भाडे संकलन करण्याचे हंगामी अधिकार दिले.

भाडे संकलन करण्याचे हंगामी अधिकार असल्याने गेल्या १०-११ वर्षात या अधिकारात वाढ करण्यात आलेली नाही. भाडे संकलक म्हणून या पदावर पालिकेने बढती न करता सन २००५ पासून आजही कदम हे पालिकेच्या नोंदी प्रमाणे भाडे संकलक म्हणून काम करत आहेत. पालिका कर्मचारी अधिकारी यांची दर ३ वर्षाने इतर विभागात बदली होते. परंतू कदम रुजू झाल्यापासून त्यांची कधीही बदली झालेली नाही असे माहिती अधिकारात कळविण्यात आलेले आहे. परिशिष्ट २ वर भाडे संकलक, वसाहत अधिकारी, वरिष्ठ वसाहत अधिकारी, सहाय्यक आयुक्त यांच्या सह्या लागतात. कदम हे १०-११ वर्षे एकाच पदावर कार्यरत असल्याने त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत एसआरए योजनेमध्ये परिशिष्ट २ मध्ये अनेक बोगस लोकांना सामावून घेतले आहे. अनेकांना स्वतःच्या सह्यांचे फोटोपास पारित केले आहेत. या सर्व प्रकारात आर्थिक संबंध असल्याने सन २०१३ मध्ये कदम यांच्या विरोधात तक्रार करूनही एफ दक्षिण विभागातील अधिकाऱ्यांनी पाठीशी घालून वाचवले होते, यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी तांबे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad