प्रजा अहवाल - निवडीनंतर २८ नगरसेवकांविरुध्द नव्याने एफआयआर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 August 2016

प्रजा अहवाल - निवडीनंतर २८ नगरसेवकांविरुध्द नव्याने एफआयआर

राष्ट्रवादी, कोंग्रेस, बीजेपी सर्वात चांगले प्रदर्शन करणारे पक्ष
उच्च प्रदर्शन करणा-या १० सभासदांमधे ७ स्त्री सभासद

मुंबई / प्रतिनिधी ३० ऑगस्ट २०१६:
प्रजाने मुंबई महानगरपलिकेच्या सभागृहाच्या नगरसेवकाच्या अखेरचा अहवाल प्रकाशित केला आहे आणि आपल्या बीएमसीच्या वर्तमान अव्यवस्थेचे सविस्तरपणे सादरीकरण केले आहे. यामधे १० सभासदांनी २०१५-२०१६ मध्ये एकाही प्रश्नाची विचारणा केली नाही. २०१२ मधल्या निवडीनंतर २८ सभासदांविरुध्द नव्याने एफआयआर नोंदवल्या गेल्या आहेत. संतोष धुरी (८३.४७%), हेमांगी चेंबुरकर (८१.२७%) आणि प्राजक्ता विश्वासराव (८१.१७%) हे २०१५- २०१६ मधले सर्वात चांगले प्रदर्शन करणारे सभासद ठरले आहेत. राहुल शेवाळे (२४.४६%), चंगेझ मुल्तानी (२५.७८%) आणि ज्ञानराज निकम (३०.७२%) हे सर्वात कमी प्रदर्शन करणारे सभासद ठरले आहेत. सर्वात चांगले प्रदर्शन करणाऱ्या राजकीय पक्षात एनसीपी (६४.२६%), आयएनसी (६३.९६%), बीजेपी (६३.९१%) ला स्थान मिळाले आहे. पुरुष सभासदांचे एकंदरीत सरासरी गुण -६१.११% आणि स्त्री सभासदांचे गुण ६२.८०% तर उच्च प्रदर्शन करणा-या १० सभासदांपैकी ७ स्त्री सभासदांनी या अहवालात स्थान मिळवले आहे. 
एप्रिल २०१२ ते मार्च २०१६च्या डेटाची/आकडेवारीची तुलना करता क्षयरोगामुळे (टीबी) २५०६७ लोक मृत्युमुखी पडले आहेत. डेंग्यु रोगामध्ये २१३% ने वाढ होऊन डेंग्युमुळे होणार्‍या मृत्युंमध्ये ६१% वाढ झाली आहे. निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी टीबीवर केवळ ३९ प्रश्न विचारले. प्रत्येक निवडणूकीच्या आधी मुंबईला सिंगापुर, शांघाई बनवणे इ. सारखे दावे केले जातात. परंतु निवडणूकीनंतर हे दावे फोल ठरले आहेत. २०१०-११ मध्ये महानगरपालिकेच्या शाळांमध्ये ४,३७,६८३ मुले होती, पण २०१४-१५ मध्ये केवळ ३,९७,०८५ मुले होती आणि अवधारणात कमालीची घट आली असून देखील याच कालावधीत शैक्षणिक अर्थसंकल्प २०१०-११ मधल्या १७६१ पासून २०१५-१६मध्ये २६३० करोडवर गेला. वाढीव निधी असतानाही आपण कशामुळे मागे राहिलो, हा असा प्रश्न निताई मेहता यांनी उपस्थित केला आहे.

“या वर्षीच्या अहवालानुसार सर्वात जास्त प्रदर्शन करणारे ३ सभासद आहेत- संतोष धुरी (८३.४७%), हेमांगी चेंबुरकर (८१.२७%) आणि प्राजक्ता विश्वासराव (८१.१७%). या वर्षात आयोजित केलेल्या ७२४ बैठकांमध्ये उपस्थिती चांगली(७१.२%) होती, २९३३ प्रश्न विचारले गेले. ८ प्रश्नांपैकी १ प्रश्न रोड आणि चौकांच्या पुन:नामांकनाबद्दल होता. सभासदनी कार्यान्वयीत केलेल्या त्यांच्या जवाबदा-या आणि कर्तव्ये ही वास्तविक समस्या आहे.” गेल्या चार वर्षांच्या (२०१३,२०१४,२०१५ आणि २०१६) प्रजाच्या गुणपत्रिकांच्या गुणांची सरासरी काढल्यास हेमांगी वरळीकर (७६.९२%), संजय पवार (७५.४५%) आणि नोशिर मेहता (७५.३६%) सर्वोच्च प्रदर्शक ठरतात. गेल्या ४ वर्षातील ३ सर्वोच्च पक्ष म्हणून बीजेपी (६३.१०%), एनसीपी (६०.८६%) आणि शिवसेना (६०.५१%) असल्याचे मिलिंद म्हस्के म्हणाले. “अमित साटम, अशोक पाटिल, मनिषा चौधरी, राहुल शेवाळे, सेल्वन तामिल, सुनिल प्रभूंना महानगर पालिकेची केवळ जागाच मिळाली नाही तर ते एमएलए/एमपी देखील आहेत. एखाद्या व्यक्तीने अशाप्रकारची दोन पदे का व्यापली पाहिजेत?” असा प्रश्न म्हस्के यांनी उपस्थित केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad