महापौर आदर्श शिक्षक पुरस्कारावर महिला शिक्षकांची छाप - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महापौर आदर्श शिक्षक पुरस्कारावर महिला शिक्षकांची छाप

Share This
मुंबई / प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिका शालांमधील शिक्षकांना दिल्या जाणार्या महापौर आदर्श शिक्षक पुरस्कारामधे महिला शिक्षकांनी मोठ्या संखेने पुरस्कार प्राप्त केले आहेत. महापौर आदर्श शिक्षक पुरस्काराची घोषणा आज महापौर स्नेहल आंबेकर, उपमहापौर अलका केरकर, सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांच्या उपस्थितीत शिक्षण समिती अध्यक्ष हेमांगी वरळीकर यांनी केली.
पुरस्कारप्राप्त 50 शिक्षकांना 10 हजार रुपये , सोन्याचा मुलामा दिलेले पदक देऊन गौरविण्यात येणार आहे. एकूण 101 शिक्षकांच्या मुलाखती घेऊन त्यातून 50 आदर्श शिक्षकांची निवड करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक 15 शिक्षक हे मराठी माध्यमातील आहेत. 50 पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्ये सर्वाधिक महिला शिक्षक असून त्यांची संख्या 33 आहे. तर 17 पुरुष शिक्षक आहेत. 5 सप्टेंबर रोजी गणेशोत्सव असल्याने 22 सप्टेंबर रोजी दिनानाथ नाट्यगृह, प्रभादेवी येथे पुरस्कार वितरण केले जाईल असे महापौर स्नेहल आंबेकर यांनी घोषित केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages