लोकप्रतिनिधींनी लोककल्याणकारी योजना तळागाळापर्यत पोहोचवाव्या - राजकुमार बडोले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

लोकप्रतिनिधींनी लोककल्याणकारी योजना तळागाळापर्यत पोहोचवाव्या - राजकुमार बडोले

Share This
पुणे, दि. 27 – सामाजिक न्याय विभागातर्फे विविध प्रकारच्या लोककल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या लोककल्याणकारी योजना पंचायत समिती सदस्यांनी तळागाळापर्यत पोहोचवाव्या असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे केले.
गोंदिया जिल्हयातील पंचायत समिती सभापती व सदस्यांना सामाजिक न्याय विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती होण्यासाठी व त्या प्रभावीपणे राबविण्यासाठी यशदा येथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या लोकप्रतिनिंधीना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी बोलताना सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले म्हणाले की, तळागाळातील जनतेच्या उध्दारासाठी व त्यांना सन्मानाने जीवन जगण्यासाठी शासनातर्फे लोककल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजनांची लोकप्रतिनिंधीना माहिती व्हावी व त्याद्वारे ग्रामीण भागाचा विकास व्हावा यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन लोकप्रतिनिंधी सर्वसामान्यांचे जीवन उंचावण्यासाठी प्रयत्न करावे व आदर्श गांव निर्माण करावे.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी,प्रशिक्षणात सहभागी झालेल्या लोकप्रतिनिधींनी लोककल्याणकारी योजनांचा लाभ ग्रामीण भागातील जनतेपर्यत पोहोचवावा असे सागितले. केंद्रीय सामाजिक न्याय विभागातर्फे यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. समाजातील विषमता नष्ट करण्यासाठी प्रयत्न करावा व जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी कटिबध्द रहावे असे आवाहन त्यांनी केले.

प्रशिक्षणात सहभागी झालेल्या लोकप्रतिनिधींनी यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले व सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्याशी थेट संवाद साधला. ग्रामीण भागातील पाणी पुरवठा, वस्तीशाळा, स्वच्छ भारत अभियान, पंचायत समितीला देण्यात येणारे अनुदान या विषयावर यावेळी चर्चा करण्यात आली. चार दिवसीय प्रशिक्षणामध्ये गोंदिया जिल्हयातील सुमारे पंचवीस पंचायत समिती सभापती व सदस्य सहभागी झाले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages