सद्‌भावना दिनानिमित्त मुख्य सचिवांच्या उपस्थितीत मंत्रालयात सामूहिक सद्‌भावना प्रतिज्ञा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 August 2016

सद्‌भावना दिनानिमित्त मुख्य सचिवांच्या उपस्थितीत मंत्रालयात सामूहिक सद्‌भावना प्रतिज्ञा

मुंबईदि.20 Aug 2016 : सद्‌भावना दिनानिमित्त मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या उपस्थितीत मंत्रालयात सामूहिक सद्‌भावना प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेस मुख्य सचिवांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

मी जात, संप्रदाय, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करीन. आमच्यामधील वैयक्तिक किंवा सामूहिक स्वरुपाचे सर्व प्रकारचे मतभेद मी हिंसाचाराचा अवलंब न करता विचारविनिमय करुन व संविधानिक मार्गांनी सोडवीन’, अशी सामूहिक प्रतिज्ञा यावेळी उपस्थितांनी घेतली. यावेळी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प वाहून अभिवादन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS