जागतिक दहशतवादाविरोधात मुंबई काँग्रेसतर्फे भव्य मानवी साखळी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

जागतिक दहशतवादाविरोधात मुंबई काँग्रेसतर्फे भव्य मानवी साखळी

Share This
मुंबई 20 Aug 2016 - मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज जागतिक दहशतवादाविरोधात मरीन ड्राईव्ह ते तारापोरवाला मत्स्यालय भव्य मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. या मानवी साखळीमध्ये १५ हजार लोक उपस्थित होते. यामध्ये सामान्य जनतेसोबतच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सुद्धा मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.

सदर प्रसंगी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या सोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार मिलिंद देवरा, प्रिया दत्त, एकनाथ गायकवाड, आमदार नसीम खान, असलम शेख, वर्षाताई गायकवाड, अमिन पटेल, कालिदास कोळंबकर, भाई जगताप, माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष कृपाशंकर सिंह, जनार्दन चांदुरकर, माजी मंत्री पतंगराव कदम, सुरेश शेट्टी, चंद्रकांत हंडोरे, माजी आमदार अशोक जाधव, चरणसिंग सपरा, बलदेव खोसा, मधु चव्हाण, मनपा विरोधी पक्ष नेते प्रवीण छेडा, काँग्रेसचे सरचिटणीस संदेश कोंडविलकर, भूषण पाटील,सर्वस्वी नगरसेवकजिल्हाध्यक्ष, पदाधिकारीब्लॉक अध्यक्ष आणि काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कुपरेज मैदानातील पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण
मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्यावतीने भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालया जवळील कुपरेज मैदानातील त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यातआली. सदरप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण, मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटीलअ.भा.काँ.क. सरचिटणीस माजी खासदार गुरुदास कामत, माजी खासदार मिलिंद देवरा, आमदार नसीम खानअसलम शेखवर्षाताई गायकवाडअमीन पटेल, भाई जगताप, माजी मुंबईकाँग्रेस अध्यक्ष कृपाशंकर सिंह, जनार्दन चांदुरकर, माजी आमदार मधु चव्हाण, राजहंस सिंह आणि काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages