‘पोलिसांनो, आधी स्वत: हेल्मेट घाला’, ‘पोलीस’ लिहू नका, पाटी ठेवू नका - पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

‘पोलिसांनो, आधी स्वत: हेल्मेट घाला’, ‘पोलीस’ लिहू नका, पाटी ठेवू नका - पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर

Share This
मुंबई, दि. ११ – राज्यात हेल्मेटसक्ती केल्यामुळे वाहतूक पोलिसांबरोबरच पोलीस ठाण्याचे अधिकारीदेखील नाक्यानाक्यावर हेल्मेट न घालणार्‍यांवर कारवाई करतात. मात्र हेच पोलीस स्वत: हेल्मेट घालत नाहीत. यामुळे दुचाकी चालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस स्वत: हेल्मेट घालत नाहीत असे प्रकार शहरात ठिकठिकाणी दिसत असल्याने याची गंभीर दखल घेत हेल्मेटसक्तीची कारवाई करताना ‘पोलिसांनो, आधी स्वत: हेल्मेट घाला’ असे आदेशच पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी दिले आहेत. कायदा मोडणार्‍या पोलिसांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराच  दिला आहे. 


दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्ती करण्यात आल्यामुळे नाक्यानाक्यावर वाहतूक पोलिसांबरोबर पोलीस ठाण्याचे अधिकारीदेखील हेल्मेट न घालणार्‍यांवर कारवाई करताना दिसतात. मात्र हे पोलीस स्वत: हेल्मेट घालत नसल्याने दुचाकीस्वार पोलिसांशी हुज्जत घालतात. हे वाद पोलीस ठाण्यांपर्यंत जातात. पोलिसांनी कायदा पाळायचा नसतो का, अशा शब्दांत नागरिकच पोलिसांना सुनावतात. असे प्रकार अनेकदा घडत असल्याने आयुक्तांनी पोलिसांना आधी आपण कायद्याचे पालन करा, असे आदेश दिले आहेत. 

खासगी वाहनांवर ‘पोलीस’ लिहू नका, पाटी ठेवू नका !
‘पोलीस’ लिहू नका, पाटी ठेवू नका! न्यायालयाच्या आदेशानुसार खासगी वाहनांवर पोलीस लिहिणे बेकायदशीर आहे. त्यामुळे पोलिसांनो, खासगी वाहनांवर पोलीस किंवा कॉप असे लिहू नका किंवा असे स्टीकर चिकटवू नका. कारमध्ये पोलीस लिहिलेली पाटी ठेवू नका असे सक्त आदेश पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी दिले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages