हाजी अली दर्ग्यात महिलांच्या प्रवेशावरील बंदी न्यायालयाने हटविली - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 August 2016

हाजी अली दर्ग्यात महिलांच्या प्रवेशावरील बंदी न्यायालयाने हटविली

मुंबई : हाजी अली दर्ग्यात महिलांच्या प्रवेशावरील बंदी आज (26 Aug 2016) मुंबई उच्च न्यायालयाने हटविली आहे. हाजी अली दर्ग्यात प्रवेशासंदर्भातील याचिकेवर निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालयाने जेथे पुरुषांना जाण्याची परवानगी आहे. तेथे महिलांनाही जाण्याचा अधिकार असल्याचे म्हणत दर्ग्यातील महिलांच्या प्रवेशावरची बंदी उठवली आहे. 

त्यामुळे यापुढे महिलांनाही दर्ग्यात प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे हाजी अली दर्ग्यातील मझारपर्यंत महिलांना प्रवेश करता येणार आहे. दर्ग्यात जाण्यासाठी महिलांना असलेली बंदी ही राज्यघटनेच्या अनुच्छेद 14, 15 व 21 च्या विरोधात आहे. येथे जाणाऱ्या महिलांच्या सुरक्षेची काळजी सरकारने व ट्रस्टने घ्यावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. याशिवाय ट्रस्टला या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठीच्या आदेशास सहा आठवड्यांची स्थगितीही देण्यात आली आहे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS