मुंबई - दहिहंडी खेळताना जखमी झालेल्या गोविंदांची आज (ता. २६ ऑगस्ट २०१६) राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केईएम रूग्णालयात जाऊन भेट घेतली. केईएम मध्ये तिसऱ्या मजल्यावर वॉर्ड क्र. ३७ मध्ये उपचारार्थ दाखल असलेल्या चार जखमी गोविंदांना भेटून त्यांची विचारपूस केली व नातेवाईकांची भेट घेतली.
त्यानंतर माध्यमांशी बोलताना आमदार अॅड आशिष शेलार म्हणाले की, आम्हाल यामध्ये राजकारण आणायचे नाही, दहिहंडी उत्साहात साजरी व्हावी म्हणून भाजपा सरकारने मुंबई उच्च न्यायालयात भूमिका घेतली तसेच सर्वोच्च न्यायालयातील याचिका पुनर्जिवित करून मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाची स्पष्टता मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर न्यायालयाने उत्सवाला कायद्याची चौकट घातली. त्यावेळी भाजपाने नियमाच्या आणि कायद्याच्या चौकटीत राहूनच उत्सव साजरा करा अशी भूमिका घेतली. दुसरीकडे या दहिहंडीला साहसी खेळाची दर्जा दिला. व हा खेळ सुरक्षित करण्याचाही प्रयत्न केला. मात्र काही जणांनी तरूणांना चेतावण्या दिल्या. अशी चेतावणीची पिपाणी वाजवणारे आता पिपाण्या गादीखाली ठेवून झोपले आहेत काय? जखमी गोविंदांना पाहायला ते का आले नाहीत. असा सवाल आमदार अॅड आशिष शेलार यांनी यावेळी केला.

No comments:
Post a Comment