ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

Share This
मुंबईदि. 1 : ब्राझिलमधील रिओ शहरात होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झालेल्या महाराष्ट्रातील खेळाडूंचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले असून या स्पर्धेतील चमकदार कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यातील ललिता शिवाजी बाबर आणि कविता रामदास राऊत (ॲथलीट)आयोनिका असिम पॉल (नेमबाजी)देविंदर सुनील वाल्मिकी (हॉकी)दत्तू बबन भोकनळ (नौकानयन) तसेच प्रार्थना गुलाबराव ठोंबरे (टेनिस) हे खेळाडू ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.


मुख्यमंत्री आपल्या शुभेच्छापर संदेशात म्हणतात की,ऑलिम्पिकसारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या क्रीडा स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड होणे ही बाब निश्चितच अभिमानाची आहे. या स्पर्धेत आपण चमकदार कामगिरी करून देशासोबतच राज्याचाही लौकिक वाढवावा. दरम्यान, नॅशनल अँटी डोपींग असोसिएशन (नाडा) या संस्थेने कुस्तीपटू नरसिंग यादव याला उत्तेजक द्रव्य सेवनप्रकरणी दोषमुक्त केले आहे. याबाबतही मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages