व्यायाम साहित्य खरेदी करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

व्यायाम साहित्य खरेदी करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

Share This
मुंबईदि. 20 Aug 2016 : क्रीडा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या स्वंयसेवी संस्थाशैक्षणिक संस्थामंडळे आणि संघटना यांना कुस्तीज्युदोकराटे व इतर खेळाच्या विकासासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत अनुदान देण्यात येते. या खेळांच्या विकासासाठी अद्ययावत व्यायामशाळा, तसेच कुस्तीज्युदोकराटे व इतर खेळाच्या विकासासाठी अनुदान’ या योजनेंतर्गत व्यायाम साहित्य खरेदी करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मुंबई शहर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

महाराष्ट्रात कुस्ती कलेची परंपरा जोपासण्यासाठी व्यायामशाळा, तालमी व आखाड्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. युवकांमध्ये व्यायामाची आवड निर्माण करुन सुदृढ नागरिक तयार करणे व कुस्ती, ज्युदो, कराटे या कलेच्या विकासासाठी अद्यावत मॅट व इतर व्यायाम साहित्य खरेदी करण्यासाठी शासनाच्यावतीने कमाल 1 लाख रुपये खर्च करण्यात येतो तथापि मंजूर आर्थिक सहाय्याच्या 25 टक्के संस्थेचा हिस्सा असे अत्याधुनिक साहित्य संचालनालयास्तरावरून पुरविण्यात येते. ज्या संस्था अनुदानासाठी अर्ज करु इच्छित आहेत, त्यांच्याकडे स्वत:च्या मालकीची जमीन अथवा दीर्घ मुदतीच्या करारावर उपलब्ध असलेल्या जमिनीवर किमान 500 चौ.फू. चटई क्षेत्राच्या व्यायामगृहासह भांडारगृह अथवा कार्यालयाची खोली व पुरुष आणि महिलांसाठी वेगवेगळी प्रसाधनगृहे व चेंजिंग रुम या सोई-सुविधा असाव्यात. संबधित संस्थांनी अनुदान मंजुरीसाठी विहीत नमुन्यातील अर्ज व माहितीसाठी जिल्ह्याच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा आणि अर्ज सादर करावा. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages