मुंबई / प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेत शिवसेना व भाजपाची सत्ता गेली २० वर्षे आहे. आत्ताच यांना योगा आणि सूर्य नमस्कार यांना कसे काय आठवते आहे. हा यांचा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा छुपा अजेंडा आहे. योगा व सूर्य नमस्कारला आमचा विरोध नाही पण त्याची जबरदस्ती करू नका. या जबरदस्तीला आमचा विरोध आहे. योगा व सूर्य नमस्कार सक्तीचे करण्यापेक्षा मुंबई महानगरपालिका शाळांची अवस्था आधी सुधारा अशी आमची मागणी आहे. मुंबई महानगरपालिका शाळांची अवस्था अत्यंत दयनीय आणि बिकट आहे. मुलांच्या शिक्षणाचा दर्जा सुधारा, चांगले व उच्च दर्जाचे शिक्षण द्या. त्यांना चांगल्या सोयी सुविधा द्या. शाळांमधील प्रसाधनगृहे स्वच्छ ठेवा. अनेक शाळांमध्ये वीज नाही. वीज नाही आणि टॅबलेट दिले गेले आहेत, त्यामध्ये हि मोठा घोटाळा झालेला आहे. मुले त्यावर फक्त गेम्स खेळतात, असे मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम पत्रकार परिषदेत म्हणाले.
ते पुढे म्हणाले की मुंबई महानगरपालिकेचे शाळांचे वर्षाचे बजेट २४०० करोड आहे म्हणजे ५०,५३४ रुपये एका विद्यार्थ्यावर ते खर्च करतात. तरी हि गेल्या ५ वर्षात शाळांची आणि विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी घटत आहे. शिवसेना स्वतःला मराठीचे कैवारी म्हणवतात तरीही मुंबई महानगपालीकेच्या मराठी शाळा २०१२-१३ मध्ये ३८५ होत्या आणि विद्यार्थी ८१२१६ होते आणि आता २०१५-१६ मध्ये तीच संख्या शाळांची ३५१ आहे व विद्यार्थी ५९८०२ झालेले आहेत म्हणजे १०४२ विद्यार्थी कमी झाले आहेत. तसेच हिंदी शाळा २०१२-१३ मध्ये २३५ होत्या त्या आता २३१ झाल्या आहेत. तसेच विद्यार्थी १२१३८० होते आत्ता १०७२९४ विद्यार्थी राहिले आहेत म्हणजे १४, १६६ घटले आहेत. शिक्षक संख्या ३१३३ वरून २८८६ झाली आहे. अशीच अवस्था गुजराथी शाळांची आहे. २०१२-१३ मध्ये ८१ होत्या त्या २०१५-१६ मध्ये ६८ राहल्या आहेत. विद्यार्थी ६६९७ होते ते ४८४३ झाले आहेत आणि शिक्षक संख्या ३६१ वरून ३१४ झालेली आहे. याचाच अर्थ एकंदरीत २०१२-१३ मध्ये शाळा ११५० होत्या त्या आत्ता २०१५-१६ मध्ये १०८३ शाळाच राहिल्या आहेत म्हणजेच ६७ शाळा बंद झालेल्या आहेत तसेच ४०,००० विद्यार्थी कमी झालेले आहेत.
संजय निरुपम म्हणाले की, मुंबई महानगरपालिका शाळांची अशी दयनीय अवस्था झालेली आहे की नवीन विद्यार्थी प्रवेश घेत नाही आहेत. प्रजा फाऊंडेशनने केलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की ४२ % पालक शिक्षणाबाबतीत समाधानी नाही आहेत. ३८ % विद्यार्थी प्रवेशात घट झाली आहे. १३% विद्यार्थी शाळेतून नावे काढून घेत आहेत. शिक्षकांना पगार मिळत नाहीत. शिक्षणाचा दर्जा संपूर्ण घटलेला आहे. मग माझा सवाल आहे की २४०० करोड रुपये गेले कुठे ? कुठे खर्च करतात ? हा हि एक महा घोटाळा आहे. याची सखोल चौकशी झाली पाहिजे. शिवसेना भाजपा सत्तेतील नेत्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे.
ते पुढे म्हणाले की शिवसेना भाजपा म्हणते मुंबईत फक्त ६ खड्डे राहिले आहेत. ते साफ साफ खोटे बोलत आहेत. मी रोज मुंबईतील विभागात पदयात्रा करत आहे, आम्हाला रोज ६०० खड्डे दिसत आहेत. ते म्हणाले होते की गणपती उत्सवाच्या आधी म्हणजेच २१ ऑगस्टच्या आधी सर्व खड्डे बुजवणार पण त्यांनी तसे केलेले नाही आहे. मुंबईत सगळीकडे खड्डेच खड्डे आहेत. सर्व या खड्ड्यांमुळे त्रस्त आहेत. महानगरपालिकेचे रस्त्याचे ३५०० करोड बजेट आहे. रस्ते दुरुस्तीचे २७०० करोड बजेट आहे. पण रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. हा एक मोठा रस्ते घोटाळा आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत शिवसेना भाजपने सर्व सामान्य जनतेची जाहिर माफी मागावी आणि याची हि सखोल चौकशी व्हावी, अशी आमची मागणी आहे.

शेवटी ते म्हणाले की मुंबई महानगरपालिकेतील ८०% शाळांमध्ये योगा सूर्य नमस्कार करण्यासाठी मैदानेच नाही आहेत मग विद्यार्थी योगा सूर्य नमस्कार कुठे करणार, असा आमचा सवाल आहे. सूर्य नमस्कार हा सरकारचा निवडणुकीसाठी भावनात्मक अजेंडा आहे, असा आमचा आरोप आहे.
सूर्यनमस्कार सक्तीचे करू नका, कॉंग्रेसचे पालिका आयुक्तांना पत्र
महापालिका शाळामधे योगा व सूर्यनमस्कार अनिवार्य करू नए या मागणीसाठी प्रवीण छेडा व कोंग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष निजामुद्दीन रायीन यांच्या नेतृत्वाखाली पालिका आयुक्तांची भेट घेतली. यावेळी आयुक्तांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात अनेक धर्म, पंथ, भाषा असलेल्या आपल्या देशात योग व सूर्यनमस्कार सक्तीचे केल्यास राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन होत असल्याने योग व सूर्यनमस्काराची सक्ती करू नए अशी मागणी करण्यात आल्याची माहिती पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी दिली.

No comments:
Post a Comment