आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविणाऱया मुंबईतील दोघींचा महापौरांनी केला सत्कार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविणाऱया मुंबईतील दोघींचा महापौरांनी केला सत्कार

Share This
मुंबई / प्रतिनिधी - थायलंड येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पोर्टस् जीत कुन डो अजिंक्यपदक कराटे स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविणाऱया मुंबईतील दोन विद्यार्थीनींचा सत्कार मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी महापौर निवास, दादर येथे आज (दिनांक २९ ऑगस्ट, २०१६) केला.

थायलंड येथे आयोजित आंतरराष्ट्रीय स्पोर्टस् जीत कुन डो अजिंक्यपदक कराटे स्पर्धेत भारताच्या प्रतिनिधी म्हणून १८ वर्षीय गटात कु. साक्षी महेश चव्हाण तर १५ वर्षीय गटात कु. रचना योगेश पाटील यांनी सुवर्णपदक पटकाविले. कु. साक्षी चव्हाण व कु. रचना पाटील या दोघीही मुंबईतील रहिवासी आहेत. कु. साक्षी चव्हाण ही दादर येथील शारदाश्रम विद्यामंदिर शाळेची तर कु. रचना पाटील ही वरळीच्या सॅक्रेड हार्ट हायस्कूलची विद्यार्थीनी आहे.

उमंग स्पोर्टस् ऍण्ड कल्चरल अकादमीचे प्रशिक्षक अभिषेक सदानंद चव्हाण यांनी कु. साक्षी व कु. रचना यांना प्रशिक्षण दिले आहे. मुंबईतील या दोन्ही विद्यार्थीनींनी थायलंड येथील स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुवर्णपदक पटकाविल्याने मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages