मुंबई - मुंबई (मध्य) प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे दुचाकी वाहनांसाठी एमएच-01-सीएल ही नवीन मालिका सुरु करण्यात येत असल्याची माहिती मुंबई (मध्य)च्या प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
मुंबई (मध्य) प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे दुचाकी वाहनांची नोंदणी करण्यात येते. महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 च्या सुधारित नियम 54 (अ) नुसार आगाऊ शुल्क भरुन वाहनांकरिता आकर्षक व पसंतीचे क्रमांक आरक्षित करण्याची तरतूद आहे. सन 2015-16 या कालावधीकरिता 4 कोटी 66 लाख 86 हजार 538 इतका महसूल वाहन क्रमांक आरक्षण शुल्काव्दारे शासनास प्राप्त झाला आहे. जनतेच्या सुलभ माहितीकरिता उपलब्ध असलेले व्हीआयपी वाहन क्रमांक व त्याचे शुल्क मुंबई (मध्य) प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये एलईडी स्क्रिनवर दर्शविण्यात येतात. अशा प्रकारे पसंतीच्या क्रमांकांचे वाटप पारदर्शक पध्दतीने करण्यात येते.

कार्यालयीन विहित नमुन्यातील अर्जान्वये कोणताही उपलब्ध वाहन क्रमांक आरक्षित करता येतो. आरक्षित केलेल्या वाहन क्रमांकाची वैधता 30 दिवसांकरिता असते. 30 दिवसांच्या आत त्या क्रमांकावर वाहन नोंदणी होणे आवश्यक असते. मुंबई (मध्य) प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या खिडकी क्र. 96 वर वाहन क्रमांक आरक्षित करण्याकरिता विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध आहेत. तसेच आवश्यक त्या मार्गदर्शनाकरिता कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आलेली आहे. आरक्षित वाहन क्रमांकाची नोंद वाहन नोंदणी शुल्क पावतीवर घेणे बंधनकारक आहे.
वाहन क्रमांक आरक्षित करण्याकरिता फोटो असलेले ओळखपत्र, निवासाचा पुरावा, पॅनकार्ड, वाहन खरेदीची पावती ही कागदपत्रे आवश्यक आहेत.सध्या चालु असलेली दुचाकी मालिका संपुष्टात येत असल्याने दुचाकी वाहनांकरिता MH-01-CL ही नवीन मालिका सुरू करण्यात येत आहे. वाहनधारकांनी आपल्या पसंतीचा क्रमांक आवश्यक ते शुल्क भरुन कोणत्याही मध्यस्तीशिवाय प्राप्त करावा, असे आवाहन मुंबई (मध्य)च्या प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.