18 वर्षाखालील व्यक्तीने दुचाकी वाहन चालविल्यास वाहन मालकावर दंडात्मक कारवाई - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 September 2016

18 वर्षाखालील व्यक्तीने दुचाकी वाहन चालविल्यास वाहन मालकावर दंडात्मक कारवाई

मुंबई, दि. 29 : 18 वर्षाखालील व्यक्तीने दुचाकी वाहन चालविल्यास दुचाकी वाहन मालकावर कारवाई करण्यात येईल, असे उप परिवहन आयुक्त (अंमल-2), मुंबई यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. यासंदर्भात त्यांनी राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना सूचना देऊन अशा प्रकरणी कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

मोटार वाहन कायद्याच्या कलम 180 नुसार 18 वर्षाखालील व्यक्तिने वाहन चालविल्यास वाहन मालकास तुरुंगवास किंवा 1 हजार रुपये पर्यंत दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा आहे. मोटार वाहन कायदा 1988 व केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 मध्ये नमुद केल्याप्रमाणे 18 वर्षाखालील मुलांनी वाहन चालविल्यास वाहन मालकास शिक्षा देण्याची तरतूद आहे. मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 4 पोटकलम (1) नुसार सार्वजनिक ठिकाणी 50 सीसी जास्त क्षमतेचे वाहन चालविणाऱ्या व्यक्तीस व कलम 18 मध्ये सार्वजनिक ठिकाणी 20 वर्षाखालील व्यक्तीस व्यावसायीक वाहन चालविण्यास मान्यता नाही, अशी माहिती उप परिवहन आयुक्त (अंमल-2), मुंबई यांनी दिली आहे.

या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याबाबतच्या सूचना प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सर्व संबंधितांना देण्यात याव्यात. तसेच याबाबतीत नागरिकांनाही माहिती देण्यात यावी, नागरिकांचे याबाबत प्रबोधन करण्यात यावे, असे निर्देश उप परिवहन आयुक्त (अंमल-2) यांनी सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Post Bottom Ad