‘महाऑनलाईन’च्या लाभांशाचा 1 कोटी 65 लाखांचा धनादेश मुख्यमंत्र्यांना प्रदान - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

‘महाऑनलाईन’च्या लाभांशाचा 1 कोटी 65 लाखांचा धनादेश मुख्यमंत्र्यांना प्रदान

Share This
मुंबई, दि. 14 : राज्य शासन व टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांचा उपक्रम असलेल्या महाऑनलाईन लिमिटेड कंपनीने सन 2015-16चा राज्य शासनाचा लाभांश 1 कोटी 65 लाख 92 हजार 500 रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला. 
वर्षा शासकीय निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमात मुख्य सचिव तथा महाऑनलाईनचे चेअरमन स्वाधिन क्षत्रिय यांच्या हस्ते मुख्यमंत्री फडणवीस यांना हा धनादेश देण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव विजयकुमार गौतम, संचालक एम. शंकरनारायणन, महाऑनलाईनचे संचालक बिरेंद्र सन्याल, चैतन्य साठे, जॉनी जोसेफ आदी यावेळी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले की, ‘महाऑनलाईन’ने आपल्या अनुभव व ज्ञानाचा उपयोग करून जास्तीत जास्त ऑनलाईन सेवा देण्याचा प्रयत्न करावा. तसेच महारोजगार, महाकौशल्य व महारिक्रूटमेंट या तीनही सेवांचे एकत्रीकरण करावे. तसेच राज्यातील विद्यापीठांच्या सेवा ऑनलाईन करण्यासाठी त्यांची एक कार्यशाळा घेण्यात यावी.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages