मुंबई - राज्याच्या कानाकोपर्यातील प्रवाशांना चोख सेवा देणार्या एसटी महामंडळाने कात टाकायला सुरुवात के ली आहे. आधुनिक युगात वाटचाल करत असताना आपल्या प्रवाशांच्या मनोरंजनासाठी प्रत्येक एसटी बसमध्ये मोफत वायफाय उपलब्ध करून देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. या निर्णयानुसार पुणे येथील शिवाजीनगर आणि स्वारगेट आगारातून सुटणार्या ५0 शिवनेरी, हिरकणी आणि परिवर्तन बसेसमध्ये येत्या दोन दिवसांमध्ये वायफायची सेवा सुरू करण्यात येणार आहे; परंतु या वायफायच्या आधारे सोशल नेटवर्किंग साईट आणि इंटरनेट सर्फिंग मात्र प्रवाशांना करता येणार नाही.
प्रवासादरम्यान प्रवाशांच्या व्यक्तिगत मनोरंजनासाठी प्रवाशांना वायफायद्वारे चित्रपट, गाणी, बातम्या ऐकायला आणि बघायला मिळाव्यात, यासाठी महामंडळाने आपल्या बसमध्ये वायफाय बसवण्याचा प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्प हाती घेतला आहे. यंत्र मीडिया सोल्युशन या कंपनीद्वारे एसटीच्या बसेसमध्ये वायफायची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वायफाय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने ५0 बसेसमध्ये वायफायची यंत्रणा बसवली आहे. याची चाचणी करण्यात आली असून वायफाय वापराचे स्टिकर्स बसेसमध्ये लावण्याचे काम सध्या सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर येत्या दोन दिवसांत बसेसमध्ये वायफाय सेवा सुरू होईल, असे एसटी महामंडळातील एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले.
प्रवाशांना या वायफायद्वारे मराठी, हिंदी, इंग्रजी चित्रपट, गाणी, बातम्या, लहान मुलांसाठी कार्टून चित्रपट, टीव्ही वाहिन्यांवरील गाजलेल्या मालिका आपल्या स्मार्ट फोनवर पाहता येणार आहेत. तसेच आवडलेले चित्रपट आणि गाणी उपलब्ध करून दिलेल्या मेन्यूद्वारे संदेश पाठवून पुन्हा पाहता येणार आहेत. मात्र रेल्वे स्थानकांवर बसवण्यात आलेल्या वायफायप्रमाणे प्रवाशांना बसमध्ये सोशल नेटवर्किंग साईटसवरून चाट आणि इंटरनेटची सुविधा उपलब्ध राहणार नसल्याचेही या अधिकार्याने सांगितले.