12 सप्टेंबर रोजी महिला लोकशाही दिन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

12 सप्टेंबर रोजी महिला लोकशाही दिन

Share This
मुंबई - महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली 12 सप्टेंबर 2016 रोजी महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येणार आहे, असे महिला व बालविकास विभागाचे उप सचिव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
महिला लोकशाही दिन राज्यमंत्री विद्या ठाकूर यांचे दालन क्र. 117,पहिला मजला, विस्तार इमारत, मंत्रालय, मुंबई येथे सकाळी 11.00 वाजता आयोजित करण्यात येणार आहे. समस्याग्रस्त व पिडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे यासाठी महिला लोकशाही दिन आयोजित करण्याबाबत दि. 4 मार्च 2013 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages