राष्ट्रकुल संसदीय मंडळाची देशस्तरीय परिषद 20 ते 23 जानेवारीला मुंबईत - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राष्ट्रकुल संसदीय मंडळाची देशस्तरीय परिषद 20 ते 23 जानेवारीला मुंबईत

Share This
मुंबई, दि. 20 : राष्ट्रकूल संसदीय मंडळाची सहावी देशस्तरीय परिषद 20 ते23 जानेवारी 2017 या कालावधीत होणार असून या परिषदेस राज्यसभेचे सभापती,लोकसभा अध्यक्ष तसेच देशातील विविध राज्यांच्या विधीमंडळ पीठासीन अधिकारी उपस्थित राहणार आहेत. सर्व संबंधित विभागानी या परिषदेची तयारी करावी, असे निर्देश विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आज दिली.
परिषदेच्या तयारी संदर्भात आज विधीमंडळात उच्चस्तरीय बैठक झाली.त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. यावेळी विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे,राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, विधीमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, राजशिष्टाचार विभागाचे अपर मुख्य सचिव सुमित मलिक, वित्त विभागाचे प्रधान सचिव व्ही. गिरीराज, उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सी.व्ही. जोशी, पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक के. एच. गोविंदराज यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रकूल संसदीय मंडळाची देशस्तरीय सहावी बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेस देशातील सर्व राज्यांचे विधीमंडळाचे पीठासीन अधिकारी व प्रधान सचिव आदी सुमारे साडेतीनशे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.ही परिषद ऐतिहासिक होण्यासाठी विविध विभागांनी तयारी करावी, असे यावेळी ठरविण्यात आले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages