सैराटकार नागराज मंजुळेंविरुद्ध रिपब्लिकन पक्षाचे आंदोलन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सैराटकार नागराज मंजुळेंविरुद्ध रिपब्लिकन पक्षाचे आंदोलन

Share This
मुंबई दि 20 -- रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याबद्दल अनुद्गार काढणारे सैराट सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्याविरुद्ध 21 सप्टेंबर दुपारी 1 वाजता सर्वोदय सिग्नल घाटकोपर पश्चिम येथे निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्या मुंबई प्रदेश प्रमुख संघटक नैनाताई संजय वैराट यांनी दिली आहे.

नवीमुंबई येथील पत्रकार परिषदेत आठवले यांनी सैराट सिनेमाचे कौतुकच केले तसेच महाराष्ट्रात सैराट सिनेमावर वेगवेगळे आरोप होत असताना सैराट हा सिनेमा चांगला सिनेमा असल्याची बाजू रिपब्लिकन पक्षाने घेतली. रामदास आठवले यांनी सैराटचे समर्थन केले असताना त्या सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आठवले यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केले. आठवलेंचे विधान गमतीचा विषय असल्याचे अवमानकारक विधान केले आहे. सैराटच्या यशाने वास्तव विसरून भान विसरलेल्या नागराज मंजुळेंना ध्यानावर आणण्यासाठी रिपाइंच्यावतीने बुधवार दि 21 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता सर्वोदय सिग्नल घाटकोपर पश्चिम येथे तीव्र निदर्शने आयोजित केली आहेत असे आयोजक नैनाताई वैराट आणि अमिना आरिफ खान यांनी कळविले आहे. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गरुड, संदेश मोरे, दिगंबर गवाणे, तसेच शरफू खान, गुलाब म्हात्रे, देवेंद्र रणपिसे, शशिकला जाधव, सुधीर निकम, आरिफ तांबोळी, मनोज रणपिसे, आदी सहभागी होणार आहेत. या वेळी दलित आदिवासींचे संरक्षण कवच असलेला ऍट्रोसिटी कायदा रद्द करू नये यासाठी हि निदर्शने करण्यात येणार आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages