मुंबईत डेंग्यूचे 296 तर लेप्टोचे 30 रूग्ण - डेंग्य, लेप्टोमुले दोघांचा मृत्यु - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 September 2016

मुंबईत डेंग्यूचे 296 तर लेप्टोचे 30 रूग्ण - डेंग्य, लेप्टोमुले दोघांचा मृत्यु

मुंबई - मुंबई मधे सध्या डेंग्यू आणि लेप्टोस्पायरेसिस आजाराने नागरिक हैरान झाले आहेत. मुंबईमधे सप्टेंबर महिन्याच्या 25 दिवसात डेंग्यूचे 296 रूग्ण तर लेप्टोचे 30 रूग्ण असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने कळविले आहे. याच दरम्यान 21 सप्टेंबरला डेंग्यूने एका 27 वर्षीय महिलेचा तर लेप्टोने 18 वर्षीय युवकाचा सायन रुग्णालयात मृत्यु झाला आहे.

मुंबईमधे सप्टेंबर महिन्याच्या 25 दिवसात तापाचे 9796, मलेरियाचे 717, ग्यास्ट्रोचे 523, हेपेटायसिसचे 108 रूग्ण असल्याची पालिकेकडे नोंद झाली आहे. डेंग्यूची आकडेवारी पाहिल्यास डेंग्यू होण्याचे प्रमाण पुरुषांमधे अधिक आहे. 0 ते 14 वर्षाच्या 52 जणाना डेंग्यू झाला त्यात 35 मुले व 17 मुली आहेत. 15 ते 29 वर्षाच्या 193 जणाना डेंग्यू झाला त्यात 155 युवक व 38 युवती आहेत, 30 ते 44 वर्षाच्या 43 जणाना डेंग्यू झाला त्यात 28 पुरुष व 15 महिला आहेत, 45 ते 59 वयाच्या 6 लोकांना डेंग्यू झाला त्यात सर्व पुरुष आहेत. तर 60 वर्षावरील 2 लोकाना डेंग्यू झाला त्यात एक पुरुष एक महिला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS