मुंबई, दि. 12 : महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 7 अर्जांवर सुनावणी करण्यात येऊन ती प्रकरणे मार्गी लावण्यात आली.
यावेळी गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मालिनी शंकर, महिला आयोगाचे सदस्य सचिव अ.ना.त्रिपाठी, विशेष पोलीस महानिरीक्षक अर्चना त्यागी, महिला व बालविकास विभागाच्या अवर सचिव गवस आदी उपस्थित होते.
