ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या 1201 दुकानांची तपासणी; 612 जणांविरुद्ध खटले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 September 2016

ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या 1201 दुकानांची तपासणी; 612 जणांविरुद्ध खटले

मुंबई, दि. 12 : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी वैधमापनशास्त्र यंत्रणेने विशेष मोहीम आखली आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यातील 1201 दुकानांची तपासणी करण्यात आली असून छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री करणे, पॅकबंद वस्तूंवर योग्य माहिती नसणे अशा प्रकरणांमध्ये 612 खटले दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती वैधमापनशास्त्र यंत्रणेने कळविली आहे.
उत्सव काळात ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबविण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी वैधमापनशास्त्र यंत्रणेस दिले होते. त्यांच्या निर्देशानुसार यंत्रणेचे नियंत्रक अमिताभ गुप्ता यांनी संपूर्ण राज्यात विशेष मोहीम राबविली. आवेष्टित (पॅकबंद) वस्तूंवर योग्य माहिती न छापल्याबद्दल 305 खटले, छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री केल्याप्रकरणी 53, छापील किमतीमध्ये खाडाखोड केल्याप्रकरणी 17 आणि कमी वजनाची मिठाई दिल्याप्रकरणी 53 खटले दाखल करण्यात आले आहेत. तसेच वजनांची फेरपडताळणी व मुद्रांकन न केल्याबद्दल 184 खटले दाखल करण्यात आले आहेत.

ग्राहकांच्या तक्रारी त्यांनी मुख्यालयातील नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्र. 022-22886666 अथवा ई-मेल पत्ता-dclmms_complaints@yahoo.com किंवाdclmms@yahoo.in तसेच व्हॉट्स अॅप क्रमांक 9869691666 अथवा फेसबुकवर “Legal Metrology Maharashtra Consumer Grievances” या ठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन गुप्ता यांनी केले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS