कामगार कल्याण्‍ मंडळात 80 कोटीचा बांधकाम घोटाळा अदयापही दुर्लक्षित - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कामगार कल्याण्‍ मंडळात 80 कोटीचा बांधकाम घोटाळा अदयापही दुर्लक्षित

Share This
मुंबई – राष्‍ट्रवादीचे माजी कामगार राज्यमंत्री डॉ.हेमंत देशमुख यांनी आपल्या कामगार मंत्रीपदाच्या काळात 80 कोटीची नियमबाहय बांधकामे केली असून या बांधकामाची माजी सनदी अधिकारी यु.के.मुखोपाध्याय यांच्याकडून चौकशी देखील झाली असून आघाडी सरकारप्रमाणे महायुतीच्या सरकारने देखील या अहवालाची अदयाप दखल घेतली नसून डॉ.देशमुख यांनी कामगारांच्या घामाच्या पैशांतून दोंडाईचा जि.धुळे येथे त्यांचे बंधू रविंद्र देशमुख चेअरमन असलेल्या ज्ञानोपासक शिक्षण्‍ संस्थेला 90 वर्षाचा नियमबाहय करार करून कामगार कल्याण्‍ मंडळाची इमारतीत मुलींचे वसतीगृह सुरू असल्याचा आरोप सिटीझन्स जस्टीस प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्र या संघटनेचे सरचिटणीस रफिक मुलानी यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परीषदेत ( 8 Sep 2016) केला.
यावेळी मुलानी म्हणाले की, कामगार कल्याण मंडळ हे कामगारासाठी कल्याण्कारी योजना राबविण्याच्या उददेशाने स्थापन करण्यात आले असून या मंडळावर राष्ट्रवादीचे माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख हे अध्‍यक्ष झाल्यापासून कामगार कल्याण्‍ मंडळ हे स्वायत्त मंडळ असून या मंडळाला राज्य सरकारचा आदेश पाळण्याचे बंधनकारक नसल्याचे सांगून राज्य शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून नियमबाहय भरती केली, व्यावसायीक उपयोगासाठी राज्यात 19 ठिकाणी बांधकामे केली, या सर्व प्रकरणात डॉ.हेमंत देशमुखांना दोषी धरण्यात आल्याचे अहवाल राज्य शासनाकडे असतांना आघाडी सरकारप्रमाणे महायुती सरकार देखील यावर अदयाप कारवाई करत नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. राज्यातील 19 ठिकाणी झालेल्या इमारत बांधकामात निवीदा रकमेपेक्षा 70 टक्के जादा दराने ही बांधकामे देण्यात आल्याची सर्व कागदपत्रे आहेत, दोंडाईचा जि.धुळे येथील इमारत तर बांधकाम झाल्यापासून आजपर्यंत कामगार कल्याण मंडळाच्या ताब्यात देखील नाही, आजही डॉ.देशमुखांच्या ताब्यात ही इमारत असतांना त्याकडे राज्य सरकार अदयापही लक्ष देत नसल्याचे श्री.रफिक मुलानी यांचे म्हणणे आहे. याबाबत श्री.मुलानी यांनी कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांना देखील आज निवदेन देवून या प्रकरणी डॉ.हेमंत देशमुख व मंडळाचे स्थापत्य अभियंता प्रकाश पाटील यांच्यावर फौजदारी गन्हे दाखल करून लाचलुचपत विभागाकडून त्याची चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे.

दोन आठवडयात कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेशया प्रकरणी रफिक मुलानी यांनी कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची भेट घेवून त्यांना याबाबचे निवेदन देवून माहिती दिली असता त्यांनी दोन आठवडयात कारवाई करून तसा अहवाल पाठविण्याचे आदेश दिले आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages