टॅब चार्जिंग कंत्राटदारावर पालिका मेहरबान - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

टॅब चार्जिंग कंत्राटदारावर पालिका मेहरबान

Share This
224 स्पाईक गार्ड आणि 7224 प्लगसाठी 91 लाख खर्च करणारमुंबई / प्रतिनिधी
मुंबई महापालिकेच्या शाळांतील आठवी व नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना टॅब तरी शाळेत चार्जिंगची सुविधा देण्यास पालिका विसरली होती. चार्जिंगसाठी लागणाऱ्या रांगा पाहून पालिकेला शाळामधे चार्जिंग प्लग लावण्याची आठवण झाली आहे. चार्जिंगसाठी लागणारे प्लग, स्पाईक गार्ड बसवण्यासाठी खर्च होणारी रक्कम आणि निविदा प्रक्रियेत एकच कंत्राटदार सहभागी झाल्यास फेरनिविदा मागवल्या जातात. मात्र, पालिकेने या वेळी फेरनिविदा न काढता सहभागी एकाच कंत्राटदाराला प्लग आणि स्पाईक गार्ड पुरवण्याचे कंत्राट देण्याचा प्रस्ताव सादर केला आहे यामुले स्थायी समितीत याचे तीव्र संताप उमटण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेच्या शाळांतील आठवी व नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना टॅब देण्यात आले. शालेमधे टॅब चार्ज करण्याची सुविधा नसल्याने विद्यार्थ्याना टॅब चार्ज करण्यासाठी रांग लावावी लागत होती. चार्ज करण्यासाठी विद्यार्थ्याना रांग लावावी लागू नए म्हणून वर्गांतच स्वतंत्र चार्जिंग पॉईंट आणि स्पाईक गार्ड बसवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समिती बैठकीत सादर करण्यात आला असून, या प्लगच्या किमतीवरून वाद होण्याची शक्‍यता आहे. पालिकेने आठवी आणि नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी 27 हजार टॅब दिले. ते चार्ज करण्यासाठी वर्गांत सात हजार 224 स्पाईक गार्ड आणि सात हजार 224 प्लग बसवण्यात येणार आहेत. प्रत्येक स्पाईकगार्डसाठी पालिका 450 रुपये, तर प्लग लावण्यासाठी 550 रुपये मोजणार आहे. या कामासाठी पालिका 91 लाख रुपये खर्च करणार आहे.

दरम्यान पालिका प्रत्येक स्पाईकगार्डसाठी पालिका 450 रुपये, तर प्लग लावण्यासाठी 550 रुपये मोजणार आहे. या कामासाठी पालिका 91 लाख रुपये खर्च करणार असल्याने या निविदे प्रक्रियेत भ्रष्टाचार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. निविदेसाठी एकच कंत्राटदार सहभागी झाल्याने नियमानुसार पुन्हा निविदा का मागवली नाही. कंत्राटदेण्यासाठी अधिकारी नियम धाब्यावर का बसवत आहेत असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages