कृषीपंपांना नोव्हेंबरपर्यंत दिवसा 12 तास वीजपुरवठा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कृषीपंपांना नोव्हेंबरपर्यंत दिवसा 12 तास वीजपुरवठा

Share This
मुंबई  : शेतकऱ्यांना शेतीला पाणी देता यावे यासाठी कृषीपंपाना दिवसा 12 तास वीज पुरवठा नोव्हेंबरपर्यंत करण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. वीजचोरीला आळा घालण्यासाठी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात पोलीस ठाणे प्राधिकृत करावेत. सौर ऊर्जेवर आधारित कृषी फिडरसाठी संगमनेर येथील कारजुले पठार आणि निमोन येथे प्रायोगिक तत्वावर फिडर सुरु करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

मंत्रालयात झालेल्या बैठकीत कृषीपंपांना 12 तास वीज पुरवठा, वीज चोरी रोखणे आणि सौरऊर्जेवर आधारित कृषीफिडरचे विद्युतीकरण याबाबत आढावा घेण्यात आला. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित होते.

कृषीपंपांना नोव्हेंबरपर्यंत 12 तास वीज पुरवठाराज्यात मराठवाडा, विदर्भासह अन्य भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने या भागातील पीकांना पाण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी वीज पुरवठ्याचे वेळापत्रक बदलण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. पाणी उपलब्ध आहे, मात्र वेळेवर वीज मिळाली नाही तर त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसेल त्यामुळे दिवसाच्या वेळी वीज उपलब्ध करुन दिल्यास पिकांना फायदा होईल त्यामुळे नोव्हेंबरपर्यंत कृषीपंपांसाठी आठ तासांऐवजी 12 तास वीज पुरवठा तात्काळ उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

वीज चोरीच्या तक्रारीसाठी प्रत्येक जिल्ह्यात पोलिस ठाणे प्राधिकृत करणारराज्यात वीजचोरीचे प्रमाण गंभीर आहे. वीजचोरीबाबत सध्या राज्यात सहा सर्कलमधील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून घेतली जाते. यामुळे वीजचोरीच्या प्रकरणात कारवाई करताना वेळेचा अपव्यय होतो ते रोखण्यासाठी व वीजचोरीला प्रतिबंध घातला यावा यासाठी आता सर्वच जिल्ह्यांमध्ये दोन किंवा तीन पोलीस ठाणे प्राधिकृत करुन तेथे वीजचोरीची तक्रार नोंदवून घेतली जाईल. वीजचोरी रोखण्यासाठी भरारी पथकांच्या सहाय्याने प्रयत्न करावेत. सुरक्षा मंडळ अधिक सक्षम करुन वीजचोरी रोखावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना दिल्या. वीजचोरी रोखण्यासाठी भरारी पथकासोबत स्थानिक पोलीसदेखील सहभागी होतील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages