मुंबई : मुंबईत झोपडपट्टय़ांच्या जवळपास शौचालयाची सुविधा नसल्याने स्वच्छ भारत अभियानांतर्गत मुंबई शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेने घरोघरी शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत घरोघरी शौचालय बांधण्यासाठी पालिकेने नागरिकांना आवाहन केले. या आव्हानाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असला तरी पालिकेकडे आलेल्या अर्जांपैकी ५० टक्के अर्ज धूळखात पडल्याने या योजनेचा बोजवारा उडाल्याचे स्पष्ट झाले आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ मुंबईसाठी मुंबई महापालिकेने घरोघरी शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला आहे. झोपडपट्टय़ांत घरोघरी शौचालयासाठी नागरिकांचे आतापर्यंत ११ हजार ७७४ अर्ज आले आहेत. त्यातील फक्त २६७ शौचालय बांधण्यात आले, तर ५४२ शौचालयांचे काम सुरू झाले आहे. म्हणजे ८0९ शौचालयांची कामे सुरू आहेत. पालिकेकडे आलेल्या अर्जांपैकी ५० टक्के म्हणजेच ५ हजार ५00 अर्जांची छाननी होऊन कोणतीही प्रक्रिया सुरू झालेली नाही. अर्ज आल्यापासून सात दिवसांत कार्यवाही करणे आवश्यक असल्याचा नियम असला तरीही हजारो अर्ज धूळखात पडले आहेत.