पॅरालॉम्पिकमधील पदक विजेत्या खेळाडूना सामाजिक न्याय विभागातर्फे पाच लाख रुपये - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पॅरालॉम्पिकमधील पदक विजेत्या खेळाडूना सामाजिक न्याय विभागातर्फे पाच लाख रुपये

Share This
मुंबई, दि. 17 : ब्राझीलमधील रिओ डी जानरो येथे नुकत्याच झालेल्या पॅरालॉम्पिक स्पर्धेत भारताला पदके मिळवून देऊन देशाची मान उंचावणाऱ्या चार खेळाडूंना राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने दिव्यांग खेलरत्न पुरस्काराने गौरविण्यात येणार असून प्रत्येकी पाच लाख रुपयांची रोख रक्कम देण्यात येणार असल्याची घोषणा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे केली.
मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत बडोले यांनी ही घोषणा केली. दिव्यांग खेळाडूंनी केलेल्या अत्युच्च कामगिरीची दखल म्हणून या विभागाच्या वतीने सन्मान करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. बडोले म्हणाले की, रिओ येथे झालेल्या पॅरा ऑलम्पिक 2016 मध्ये विविध खेळांत या दिव्यांग खेळाडूंनी चमकदार कामगिरी करून देशाला चार पदके दिली आहेत. यामध्ये भालाफेकमधील सुवर्णपदक विजेते देवेंद्र झझारिया, उंच उडीतील सुवर्ण पदक विजेते मरियप्पन थंगवेलू,गोळाफेकमधील रौप्य पदक विजेती दीपा मलिक व उंच उडीतील कांस्य पदक विजेता खेळाडू वरुणसिंह भाटी यांचा समावेश आहे. या चौघांनाही राज्य शासनाच्या वतीने दिव्यांग खेलरत्न पुरस्कार आणि रोख रक्कम पाच लाख रुपये देण्यात येणार आहे. लवकरच या पुरस्काराचे वितरण मुंबईत होणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages