भाभा रूग्णालयात बायोगॅस प्लाण्टचे लोकार्पण - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

भाभा रूग्णालयात बायोगॅस प्लाण्टचे लोकार्पण

Share This
मुंबई दि. १७ - खासदार पुनम महाजन, मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार आणि उपायुक्त शरद उघाडे यांच्या विशेष प्रयत्नांतून सिएसआर फंडातून उभा राहिलेला भाभा रुग्णालयातील बायोगॅस प्लाण्ट चे लोकार्पण आज मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते आणि पालिका आयुक्त अजोय महेता यांच्या हस्ते करण्यात आले.
भाभा रुग्णालायात जमा होणारा ओला कचरा यावर प्रक्रिया करून बायोगॅस तयार करण्याचा हा प्रकल्प मुंबईतील महापालिका रुग्णालयातील पहिला प्रकल्प असून एका वेळी २०० कि.गॅ. कचऱ्यातून २४ तासात १६ घ.मी. गॅस निर्मिती म्हणजेच ८ कि.ग्रॅ. एलपीजी एवढ्या गॅसची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी ४०,००० लिटर क्षमतेची पाचक टाकी उभारण्यात आली असून या टाकीतून निर्माण होणारा गॅस भाभा रुग्णालयाच्या नवव्या मजल्यावर असणाऱ्या कॅंटिनला मोफत देण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे कौतुक करताना आमदार अॅड. आशिष शेलार यांनी या प्रकल्पामुळे कचऱ्याची योग्य विल्हेवाट लागणार असून महापालिकेच्या वाहन, इंधन, कर्मचारी या सर्वाची बचत होणार आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत अशा प्रकारचे प्रकल्प मुंबईतील पंचतारांकीत हॉटेललाही सुरू करण्यात प्रोत्साहित करावेत असे आवाहन त्यांनी पालिका आयुक्तांना केले. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त लोकोपयोगी प्रकल्पाचे लोकार्पण करताना आपल्याला आनंदी होत असून पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त असेच कार्यक्रम मुंबईत राबवण्यात येत आहेत. भाजपा तर्फे मुंबईत ३६ ठिकाणी अवयवदान शिबिरेही घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपमहापौर अलका केरकर यांच्या सह विभागातील नागरिक, विविध एनजीओंचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages