आरटीओमध्ये चालकांविरोधात पाच वर्षांत १४ हजार ९४७ तक्रारींची नोंद - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आरटीओमध्ये चालकांविरोधात पाच वर्षांत १४ हजार ९४७ तक्रारींची नोंद

Share This
मुंबई : प्रवाशांशी चांगली वर्तवणूक न ठेवणाऱ्या टॅक्सी, आॅटोरिक्षा, सार्वजनिक प्रवासी बस चालकांविरोधात मुंबईकरांनी तक्रारींचा पाऊसच पाडला आहे. २0११-१२ ते २0१५-१६ या पाच वर्षांत मुंबईतील तिन्ही आरटीओमध्ये एकूण १४ हजार ९४७ तक्रारींची नोंद झाली आहे. यामध्ये अंधेरी आरटीओत ५0 टक्के तक्रारींचा समावेश आहे.

मुंबईतील रिक्षा, टॅक्सी, सार्वजनिक प्रवासी बस चालकांविरोधात प्रवाशांशी गैरवर्तवणूक केल्याच्या तक्रारी आरटीओच्या टोल फ्री क्रमांकावर उपलब्ध होतात. प्रवाशांना भाडे नाकारणे, उद्धट वर्तणूक, अवाजवी भाडे मागणे, बस थांब्यावर न थांबणे याद्वारे तक्रारी आरटीओकडे प्राप्त होतात. प्रवाशांना तक्रार करता यावी, यासाठी १८00२२0११0 हा टोल फ्री क्रमांकही मुंबईकरांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. या क्रमांकावर २४ तास सार्वजनिक सेवा देणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध तक्रार नोंदविता येते. त्याप्रमाणे, पाच वर्षांत ताडदेव, अंधेरी आणि वडाळा आरटीओत एकूण १४ हजार ९४७ तक्रारींची नोंद झाली आहे. यामध्ये ताडदेव आरटीओत ३ हजार ९१, अंधेरी आरटीओत ७ हजार ३३0 आणि वडाळा आरटीओमध्ये ४ हजार ५२६ तक्रारी दाखल झाल्या आहेत. २0१५-१६ मध्ये एकूण १हजार १२९ परवाने निलंबित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages