साथिच्या रोगांबाबत नागरिकांप्रमाणे आयएएस अधिकाऱ्यांवरही कारवाई करा - सचिन अहिर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

साथिच्या रोगांबाबत नागरिकांप्रमाणे आयएएस अधिकाऱ्यांवरही कारवाई करा - सचिन अहिर

Share This
मुंबई / अजेयकुमार जाधव -  20 Sep 2016
मुंबईमधे डेंग्यू, मलेरिया, लेप्टो सारखे आजार पसरले आहेत. शहरात साथिचे आजार पसरत असताना सामान्य नागरीकांवर व शाहिद कपूर सारख्या सेलीब्रेटीवर कारवाई केली जाते. मात्र डेंग्यूच्या आळ्या मंत्रायला शेजारील यशोधन इमारती मधील आयएएस अधिकाऱ्याच्या घरी सापडल्या त्यांच्यावर मात्र कोणतीही कारवाई केली जात नाही. आयएएस अधिकाऱ्याना वेगळा न्याय का लावला जात आहे असा प्रश्न उपस्थित करून सामान्य नागरिक आणि आयएएस अधिकाऱ्याना समान न्याय लावावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केली.
मुंबईमधे पसरणाऱ्या साथिच्या रोगाबाबत पालिका आयुक्तांची राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यानंतर पालिकेतील पत्रकारांशी अहिर बोलत होते. मुंबईमधे सप्टेंबर महिन्यात पहिल्या 11 दिवसात मलेरियाचे 315, लेप्टोचे 9, डेंग्यूचे 122, ग्यास्ट्रोचे 249 रूग्ण आढळले आहेत. ही आकडेवारी मागील वर्षापेक्षा कमी असल्याचे सांगून पालिका प्रशासन आपली पाठ थोपटत असली तरी परिस्थिती यापेक्षा वेगळी आहे. मुंबईमधे विविध आजारानी दरवर्षी 1000 ते 1200 रूग्ण मृत्युमुखी पडत असतात. यामुले पालिका आयुक्तांनी आरोग्याच्या प्रश्नाकडे तातडीने लक्ष घालावे अशी मागणी केल्याचे अहिर यांनी सांगितले.

पालिका रुग्णालयात मिळणाऱ्या सोयी सुविधावर नागरिकाना विश्वास नसल्याने पालिका रुग्णालयात 30 टक्के रूग्ण उपचार घेत असताना 70 टक्के रूग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. पालिकेने ट्रोमा केअर रुग्णालयाची उदघाटने केली असली तरी त्यात डॉक्टर आणि कर्मचारी नाहित त्यांची त्वरित भरती करावी, रुग्णाचा डाटा बनवावा, केंद्र, राज्य व पालिकेच्या जाहिरातीमधे विसंगती असल्याने पालिकेने केंद्र व राज्य सरकारच्या आरोग्य विभागाची मदत घ्यावी, साथिचे आजार पसरणाऱ्या ठीकाणी कंस्ट्रक्शन साईटवर धूम्र फवारणी व औषधाची फवारणी करावी, डेंग्यू मलेरियाच्या आळ्या कंस्ट्रक्शन साईटवर सापडल्यास बिल्डरना सूचना केल्या जातात तसे न करता बिल्डरवरही कारवाई करावी अश्या मागण्या आयुक्तांकड़े केल्याचे अहिर यांनी सांगितले. आयुक्तांकड़े गेलेल्या शिष्टमंडळात अहिर यांच्यासोबत पालिकेतील गटनेते धनंजय पिसाळ, नगरसेवक व पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages