‘राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण च्या योजनांचे’ शनिवारी उद्घाटन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

‘राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण च्या योजनांचे’ शनिवारी उद्घाटन

Share This
मुंबई, दि. 22 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या सात योजनांचा प्रसार व अंमलबजावणीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती टी. एस. ठाकूर यांच्या हस्ते शनिवार, दिनांक 24 सप्टेंबर, 2016 रोजी सकाळी 10.00वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर येथे होणार आहे. अशी माहिती‘महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणा’चे सदस्य सचिव सुनिल कोतवाल यांनी दिली.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाने तयार केलेल्या सात योजना या आदिवासी, मानवी तस्करी व लैंगिक शोषणाचे बळी, असंघटित कामगार, मनोरुग्ण आणि मानसिक अपंग व्यक्ती, गरीबी निर्मूलन योजना, अंमली पदार्थामुळे पिडीत व्यक्ती या सर्वांच्या मदतीसाठी तयार करण्यात आल्या आहेत.

या कार्यक्रमास सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. आर. दवे, न्यायमूर्ती एस. ए. बोबडे, मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती डॉ. मंजूळा चेल्लूर व न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे यांच्यासह जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष व सचिव, सत्र न्यायालयांचे न्यायाधीश, महानगर दंडाधिकारी, लघुवाद न्यायालयांचे न्यायिक अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

उद्घाटन समारंभानंतर सोलापूर येथील प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश विभा कनकनवाडी, अहमदनगर येथील प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत कुलकर्णी, मुंबई येथील शहर दिवाणी व सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल यांचे या विविध योजनांवर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन सदस्य सचिव कोतवाल यांनी केले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages